आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

47 वर्षांची झाली मलायका:अरबाजपासून घटस्फोट घेतल्यानंतर मलायकाला मिळाले होते 15 कोटी, नाते तुटण्याच्या आदल्या रात्री काय घडले होते? याचा स्वतः केला होता खुलासा

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 1998 मध्ये अरबाज आणि मलायका यांनी लव्ह मॅरेज केले होते.

मलायका अरोरा आज आपला 47 वा वाढदिवस साजरा करत आहे. मलायका तिच्या स्टाइलिश अंदाज आणि अर्जुन कपूरसोबतच्या अफेयरमुळे चर्चेत आहे. पण अरबाज खानसोबतच्या घटस्फोटामुळे देखील ती बराच काळ चर्चेत होती.

2017 मध्ये दोघांनी त्यांचे 19 वर्षांचे वैवाहिक आयुष्य संपुष्टात आणले होते. यानंतर मलायका करीना कपूरच्या 'व्हाट वूमन वाँट' या चॅट शोमध्ये पहिल्यांदा आपल्या घटस्फोटाविषयी बोलली होती. ज्या दिवशी कोर्टात घटस्फोटाच्या अर्जावर सुनावणी होणार होती, त्याच्या आदल्या रात्रीची तिची काय अवस्था होती, हे तिने सांगितले होते.

  • अशी होती मलायकाची मनःस्थिती

अभिनेत्री करीना कपूर हिच्याशी संवाद साधत आणि तिच्या प्रश्नांना उत्तरे देत तिने याविषयीची माहिती दिली होती. घटस्फोट ही भारतीय समाजात एक मोठी गोष्ट मानली जाते. अशा वेळी घटस्फोट घेत असताना तुला काय सल्ले मिळाले होते? असा प्रश्न तिला विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देत आपल्याला नेमके कोणकोणते सल्ले मिळाले याविषयी तिने सांगितले होते. घटस्फोटाच्या आदल्या रात्रीही तिच्या पालकांनी या साऱ्याचा पुन्हा विचार करण्याचा सल्ला तिला दिला होता. तू खरंच या निर्णयावर ठाम आहेस का? असाच प्रश्न तिला विचारला. आपण निर्णयावर ठाम असून, दुसऱ्या दिवशी तिने अरबाजसोबतच्या नात्यातून घटस्फोट होत वेगळी वाट निवडली होती.

आयुष्यात जेव्हा असे प्रसंग येतात तेव्हा घटस्फोट घेणे कसे अयोग्य आहे हेच तुम्हाला सांगण्यात येते असे तिने स्पष्ट केले. ज्यावेळी नात्यात पुढे नेण्याजोग्या काही गोष्टीच उरत नाहीत तेव्हा ते रेटण्यात काहीच अर्थ नसतो अशी आपली भूमिका तिने स्पष्ट केली. अरबाजसोबतच्या नात्यातून वेगळे झाल्यानंतरही मलायकाचे खान कुटुंबीयांशी असणारे नातं बदललेले नाही. किंबहुना अरबाज आजही तिचा चांगला मित्र आहे. त्याच्या विविध कौटुंबीक समारंभांनाही तिची आवर्जुन उपस्थिती असते.

घटस्फोटानंतर अरबाजने दिले होते 15 कोटी
घटस्फोटानंतर पोटगी म्हणून मलायकाने अरबाज खानकडे 10 कोटी रुपये दिले होते. रिपोर्टनुसार, 10 कोटीपेक्षा कमी पोटगी घ्यायला ती तयार नव्हती. तर अरबाजने मात्र पोटगी म्हणून तिला 15 कोटी रुपये दिले होते.

  • 1998 मध्ये झाले होते मलायका-अरबाजचे लग्न

1998 मध्ये अरबाज आणि मलायका यांनी लव्ह मॅरेज केले होते. या दोघांचा 15 वर्षांचा एक मुलगा देखील आहे. एका मुलाखतीत अरबाजने मलायकासोबतच्या नात्याविषयी सांगितले होते. परफेक्ट नाते नेमके कसे असते, हे अद्याप समजले नसल्याचे अरबाज म्हणाला होता. त्याच्यानुसार, ''मी 19 वर्षे हे नाते टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात यशस्वी होऊ शकलो नाही.''

  • दोघांनाही मिळाला नवीन जोडीदार

अरबाजपासून विभक्त झाल्यानंतर मलायका सध्या अभिनेता अर्जुन कपूरसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. तर दुसरीकडे अरबाजदेखील विदेशी गर्लफ्रेंड जॉर्जियासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहे.