आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूडचे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक बप्पी लहरी यांचे वयाच्या 69 व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील जुहू येथील क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. 29 दिवस ते जुहू येथील क्रिटी केअर रुग्णालयात दाखल होते. यानंतर 15 फेब्रुवारीला त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, घरी त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली आणि त्यांना गंभीर अवस्थेत जुहूच्या क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले आणि मंगळवारी त्यांनी 11.45 वाजता अखेरचा श्वास घेतला. बप्पी दा हे एक उत्कृष्ट संगीतकार आणि गायक होते, पण त्यांच्या सोन्याच्या आवडीमुळे ते चर्चेत असायचे. ते एवढे सोन्याचे दागिने घालायचे की त्यांना भारताचा गोल्डमॅन असे म्हटले जायचे.
राजकुमार म्हणाले होते - फक्त मंगळसूत्राची कमी आहे…
एकदा बॉलिवूड अभिनेते राजकुमारने यांनी बप्पी लहरी यांची खिल्ली उडवली होती. त्यांच्या गळ्यातील भरपूर सोन्याचे दागिने पाहून त्यांना हसू अनावर झाले होते. एका पार्टीत हे घडले होते. एका पार्टीत संगीतकार बप्पी यांची राजकुमार यांच्याशी भेट झाली होती. बप्पी दांनी सवयीप्रमाणे भरपूर सोन्याचे दागिने घातले होते. पार्टीत राजकुमार यांनी बप्पी दांकडे वरपासून खालपर्यंत पाहिले आणि मग आपल्या शैलीत म्हणाले, "वाह, अप्रतिम! तू एकापेक्षा एक दागिने घातले आहेस. फक्त मंगळसूत्राची कमी आहे… तेही घालायचे होते.. जास्त चांगले वाटले असते.’
मायकल जॅक्सन देखील होता चाहता
काही वर्षांपूर्वी जेव्हा बप्पी दा कपिल शर्मा शोमध्ये पाहुणे म्हणून आले होते तेव्हा त्यांनी सांगितले होते की, एकदा मायकल जॅक्सननेही त्यांच्या गळ्यात सोन्याचे गणपतीचे लॉकेट पाहून त्यांचे कौतुक केले होते. बप्पी दा म्हणाले होते, "जेव्हा मी एका कार्यक्रमात मायकल जॅक्सनला भेटलो, तेव्हा त्याने माझ्या गळ्यात गणेशाचे लॉकेट पाहिले आणि म्हणाला की, 'फॅन्टॅस्टिक, तुमची चेन अप्रतिम आहे..' बप्पी दांनी त्यावेळी सांगितल्यानुसार, त्यानंतर मायकलने डिस्को डान्सरमधील त्यांच्या जिमी जिमी या गाण्याचे कौतुक केले होते.
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले गेले आहे
द कपिल शर्मा शोमध्ये बप्पी दाच्या नावावर एक अनोखा विश्वविक्रम असल्याचेही समोर आले होते. खरं तर, 1986 मध्ये त्यांनी 33 चित्रपटांसाठी सुमारे 180 गाणी रचली होती. त्यांच्या या कामगिरीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली होती.
वयाच्या तिस-या वर्षापासून त्यांनी तबला शिकण्यास सुरुवात केली. वयाच्या 11 व्या वर्षी त्यांनी गाणी रचायला सुरुवात केली आणि वयाच्या 19 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण करण्यासाठी ते कोलकाताहून मुंबईत आले. 48 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी 500 चित्रपटांमध्ये सुमारे 5000 गाणी कंपोज केली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.