आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आज (19 नोव्हेंबर) अभिनेत्री झीनत अमान यांचा वाढदिवस असून त्यांनी वयाची 69 वर्षे पूर्ण केली आहेत. 1987 मध्ये आलेल्या 'डाकू हसीना' या चित्रपटात त्यांनी त्यांचे आतेभाऊ रझा मुराद यांच्यासोबत काम केले होते. आईवडिलांच्या मृत्यूनंतर डाकू बनलेल्या तरुणीची व्यक्तिरेखा त्यांनी या चित्रपटात साकारली होती. तर रझा मुराद यांनी भंवर सिंह ही खलनायकाची भूमिका वठवली होती. या चित्रपटात झीनत आणि रझा मुराद यांच्यावर एक रेप सीन चित्रीत झाला होता. मात्र सुरुवातीला रझा यांनी हा सीन करण्यास नकार दिला होता. खास गोष्ट म्हणजे झीनत या रझा मुराद यांची सख्खी मामेबहीण आहे. या सीनविषयी रझा मुराद यांनी त्यावेळी घडलेला किस्सा शेअर केला आहे.
रझा मुराद सांगतात, झीनत माझी सख्खी मामेबहीण आहे आणि मी तिचा आत्येभाऊ आहे. आमचे बालपण सोबतच गेले. मी झीनता बबूशा आणि ती मला मुन्नेमियाँ म्हणत होती. लग्नाच्या काही वर्षानंतर माझे मामी आणि मामू वेगळे झाले. घटस्फोटानंतर झीनतच्या आईने एका जर्मनसोबत लग्न केले. त्यामुळे झीनत जर्मनीलादेखील राहत होती आणि वडिलांसोबत ही राहत होती. आम्ही दोघे मोठे झालो तर मी फिल्म इंस्टिट्युट जाॅइन केले आणि झीनत मिस आशिया बनली.
त्यानंतर 1958 नंतर 1973 मध्ये आम्ही 'चोरी मेरा काम’च्या सेटवर भेटलो. इतक्या वर्षानंतर झीनतला सेटवर भेटलो तेव्हा घाबरलो,कारण ती खूप मोठी स्टार झाली होती आणि मी संघर्ष करत होतो. मात्र जेव्हा तिला कळले तेव्हा माझ्या गळ्यात पडली. त्यानंतर आम्ही 'बंधन कच्चे धागों का’, 'रोटी कपडा और मकान’, 'चोर के घर चोरी’, 'डाकू हसीना’, 'बॉम्बे 405 मिल’, 'तकदीर’ आदी चित्रपटांत काम केले.
'डाकू हसीना’च्या वेळी खूपच विचित्र स्थिती निर्माण झाली होती. कारण मला बलात्काराचे दृश्य शूट करायचे होते. यात माझा पहिला दिवस शूटचा होता. त्याच दिवशी मला कळले यात बलात्काराचे दृश्य आहे. मला टेन्शन झाले. मी दिग्दर्शकाला भेटलो आणि माझ्याकडून होणार नाही, असे सांगितले. मात्र ते म्हणाले, या दृश्यावरच सर्व चित्रपट टिकून आहे. तुम्ही रेप केला तर कथा पुढे चालेल आणि हिरोइन तुम्हाला गोळी मारून सूड घेईल.
असो, आमचे बोलणे सुरू होते, तेव्हा झीनत आली. मी घाबरल्याचे तिला कळले. ती माझ्याकडे आली आणि म्हणाली, मुन्नेमियाँ, हा आपला व्यवसाय आहे. याचा आपल्या खासगी जीवनाशी काही संबंध नाही, त्यामुळे तुम्ही लाजू नका, दिग्दर्शक जसे म्हणतात, तसे करा. आपला करार आहे तर करावेच लागेल. त्यांनी इतके समजून सांगितल्यावरही मी घाबरत होतो. तेव्हा ती म्हणाली, मुन्नेमियाँ मी शेवटी तुम्हाला गोळी मारणार आहे, मात्र जिवानिशी खरंच मारणार नाही, तुम्ही हे दृश्य करणार आहात, ते खरं थोडीच करणार आहात. त्यानंतर कसेबसे ते दृश्य केले. तेव्हा सर्वांना कळले, आम्ही बहीण-भाऊ आहोत.
त्यानंतर एकदा आम्ही अमरसिंहांच्या अभियानासाठी आग्रा येथे गेलो होतो. तेथे मला पाहून खूप भावुक झाली, कदाचित तिला बालपणीची आठवण झाली असावी, मग मी तिला जवळ घेत गप्प केले. रात्री वेळ मिळताच लहानपणीच्या गप्पा मारल्या.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.