आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • When Rekha Became ‘national Vamp’ After Husband’s Suicide: Singer Chinmayi Sripada Shares Biography Excerpt Amid Rhea Chakraborty’s Media Trial

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एकेकाळी रेखाला सहन करावा लागला होता मीडिया ट्रायल:रिया चक्रवर्तीच्या मीडिया ट्रायलसोबत रेखाची तुलना, पतीच्या आत्महत्येनंतर म्हटले गेले होते नॅशनल व्हॅम्प, ब्लॅक व्हिडो

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनुपम खेर म्हणाले होते, रेखा आता राष्ट्रीय खलनायिका बनली आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी गेल्या तीन महिन्यांपासून त्याची प्रेयसी रिया चक्रवर्तीची मीडिया ट्रायल सुरू आहे. रियाची ही मीडिया ट्रायल बॉलिवूडच्या एका जुन्या घटनेची आठवण करून देणारी आहे. हे प्रकरण बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रेखा यांच्याशी संबंधित आहे. 1990 मध्ये पती मुकेश अग्रवाल यांच्या निधनानंतर रेखा यांनाही अशाच प्रकारचा मीडिया ट्रायल सहन करावा लागला होता आणि त्यांना नॅशनल व्हॅम्प म्हटले गेले होते.

गायिका चिन्मयी श्रीपदा हिने अलीकडेच ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये रेखा यांच्या 'रेखा: द अनटोल्ड स्टोरी बाय यासेर उस्मान' या बायोग्राफीतील काही गोष्टींचा उल्लेख आहे.

या बायोग्राफीत असलेल्या उल्लेखानुसार, पती मुकेश अग्रवाल यांच्या आत्महत्येनंतर रेखा यांच्या सासरच्यांनी त्यांना चेटकीन म्हटले होते, सोबतच बॉलिवूडमधील सहकलाकारांनीही त्यांचा अपमान
करण्याची एकही संधी सोडली नव्हती. बायोग्राफीत काय लिहिले आहे ते वाचा...

1) 2 ऑक्टोबर 1990 रोजी रेखा यांचे पती मुकेश यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांनी रेखा यांच्या ओढणीने गळफास घेतला होता. मुकेश यांच्या भावाने सांगितल्यानुसार, या दिवशी मुकेश आनंदी दिसत होते, मात्र नंतर असे काय घडले की त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले, हे समजले नाही. मुकेश डिप्रेशनमध्ये असल्याचे रेखा यांना लग्नानंतर समजले होते.

2) मुकेश यांच्या निधनानंतर आरोप-प्रत्यारोपांचा खेळ सुरू झाला. लोकांनी रेखा यांच्याकडे तिरस्काराने पाहिले आणि त्यांचे वर्णन नव-याचा जीव घेणारी चेटकीण असे केले गेले होते.

3) मुकेश यांच्या आईने माध्यमांना सांगितले की, त्या चेटकिणीने माझ्या मुलाचा जीव घेतला, देव तिला कधीच क्षमा करणार नाही.

4) मुकेश यांचे भाऊ अनिल म्हणाले होते, माझ्या भावाचे रेखावर खरे प्रेम होते. तिच्या प्रेमासाठी प्रेम करा किंवा मरा अेशी त्याची अवस्था झाली होती. रेखाने त्याच्यासोबत जे केले, त्याकडे डोळेझाक केली जाऊ शकत नाही. तिला आता काय हवंय, आमचा पैसा हवाय का तिला?

5) सुभाष घई म्हणाले होते की, रेखाने संपूर्ण चित्रपटसृष्टीच्या चेह-यावर काळे फासले आहे. मला वाटतं की, कोणतेही सुसंस्कृत घराणे एका अभिनेत्रीचा सून म्हणून स्वीकारल करण्यापूर्वी चार वेळा विचार करेल. आता रेखाचे करिअर संपले असेच समजा. कोणताही समजूतदार दिग्दर्शक तिला आपल्या चित्रपटात घेणार नाही, कारण प्रेक्षक आता रेखाला 'भारतीय नारी' म्हणून स्वीकारणार नाहीत.

6) अनुपम खेर म्हणाले होते, रेखा आता राष्ट्रीय खलनायिका बनली आहे. ती जर माझ्यासमोर आली तर माझी प्रतिक्रिया कशी असेल? हे मला समजत नाही.

7) 1990 साली रेखा आणि जितेंद्र स्टारर 'शेषनाग' हा सिनेमा रिलीज झाला होता. सिनेमाच्या रिलीजच्या काही दिवसांतच मुकेश यांनी आत्महत्या केली होती. याकाळात लोकांनी रेखा यांच्या सिनेमांच्या पोस्टर्सना काळे फासले होते. अनेक ठिकाणी त्यांच्या पोस्टर्सवर लोकांनी शेण फेकले होते. त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला गेला होता. मीडियामध्ये मुकेश यांच्या आत्महत्येच्या बातम्या आक्षेपार्ह मथळ्याने प्रकाशित करणे सुरु केले होते, उदाहरणार्थ शो टाइम मॅगझिनने नोव्हेंबर 1990 च्या अंकात द ब्लॅक विडो हे शीर्षक दिले होते. तर सिने ब्लिट्जने द मकैब्रे ट्रुथ बिहाइंड मुकेश सुसाइड या मथळ्याने वृत्त प्रकाशित केले होते. तर काहींनी रेखा एक्सपोज्ड तर काहींनी रेखाच्या नव-याचा आश्चर्यचकित करणारा भूतकाळ या मथळ्याने बातम्या प्रकाशित केल्या होत्या.

चिन्मयीने लिहिले आहे, '1990-2020: 30 वर्षे, तसेच प्रकरण, तशाच प्रतिक्रिया. रेखा त्यात कशा टिकून राहिल्या हे अविश्वसनीय आहे?'