आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत आत्महत्या प्रकरण:आता स्वत:ला सुशांतची गर्लफ्रेंड सांगतेय रिया चक्रवर्ती, त्याच्या मृत्यूच्या दोन महिन्यांपूर्वी अफेअरच्या बातम्यांचे केले होते खंडन

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एप्रिल महिन्यात रियाने सुशांतला डेट करत नसल्याचे सांगितले होते.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर रिया चक्रवर्ती स्वत:ला त्याची गर्लफ्रेंड असल्याचे सांगतेय. सोबत त्याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्याचा दावादेखील ती करतेय. पण सुशांतच्या मृत्यूच्या दोन महिन्यांपूर्वी म्हणजे एप्रिलमध्ये तिने त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या वृत्ताचे खंडन केले होते. सुशांतला डेट करत आहे का? असा प्रश्न तिला विचारला गेला होता, त्याचे उत्तर देताना नाही, हे चुकीचे आहे असे ती म्हणाली होती.

  • रिया म्हणाली- सुशांत आणि मी फक्त चांगले मित्र आहोत

रिया म्हणाली होती- मी किंवा सुशांतने कधीही हे स्वीकारले नाही. कारण, ते बरोबर नाही. सुशांत आणि मी फक्त चांगले मित्र आहोत. मी त्याला आठ वर्षांपासून ओळखत. यशराज फिल्म्समध्ये आम्ही एकत्र होतो आणि बर्‍याच काळापासून आमची मॅनेजरही एकच होती. एवढ्या वर्षांत आमची मैत्री वाढली. मी माझ्या सर्व मित्रांवर खूप प्रेम करते आणि ते मी लपवत नाही.

मी माझ्या आयुष्यात असलेल्या लोकांवरील माझ्या प्रेमाबद्दल खूप सार्वजनिक आहे. मग ती मुलगी असो किंवा मुलगा. राहिला प्रश्न सुशांतचा तर, मी ज्या लोकांना ओळखते त्यापैकी तो सर्वात चांगला आणि कुल व्यक्ती आहे. मला त्याच्याबद्दल आणखी काही माहिती नाही. पण तो माझ्यासाठी अत्यंत गोंडस आणि आकर्षक आहे. तो माझ्याबद्दल काय विचार करतो हे मला ठाऊक नाही, असे रिया म्हणाली होती.

  • सुशांतची ती सवय, जी रियाला पसंत नव्हती

रियाला यावेळी विचारले गेले होते की, सुशांतची अशी कुठली सवय आहे का जी तुला आवडत नाही? याचे उत्तर देताना ती म्हणाली होती, "सुशांत खूप हुशार आहे. त्याला सर्व गोष्टींची खूप जास्त माहित आहेत. ही सवय नाही, तो तसाच आहे. सुशांतशी बोलल्यानंतर आपल्याला पुन्हा स्वतःबद्दल विचार करावा लागतो."

  • सुशांतला रियाशी लग्न करायचे होते

सुशांतला रियासोबत लग्न करायचे आहे, अशी बातमी ऑगस्ट 2019 मध्ये आली होती. पण रियाला अजून काही वेळ हवा होता. एका मुलाखतीत सुशांत रियाबरोबरच्या त्याच्या नात्याबद्दल बोलला होता.

तो म्हणाला होता की, "याक्षणी काही बोलणे योग्य नाही. नुकत्याच सुरु झालेल्या नात्याविषयी लोकांनी बोलणे योग्य नाही. जर तुम्ही माझ्याबद्दल प्रश्न विचारले तर मी उत्तर देऊ शकतो. जर तुम्ही दुस-या व्यक्तीविषयी प्रश्न विचाराल तर मला त्याला विचारावे लागेल." रियाच्या आधी सुशांतचे नाव अंकिता लोखंडे, कृती सेनॉन आणि सारा अली खान यांच्याशी जोडले गेले होते.

बातम्या आणखी आहेत...