आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनाचा मोठेपणा:जेव्हा सरोज खान यांना इंडस्ट्रीत मिळत नव्हते काम, तेव्हा मदतीसाठी पुढे आला होता सलमान खान, विचारले होते - 'माझ्यासोबत काम कराल?'

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सलमानने सरोज खान यांना 'दबंग 3' या चित्रपटासाठी सई मांजरेकरला ट्रेनिंग देण्याचे काम दिले होते.

बॉलिवूडच्या प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांनी वयाच्या 71 व्या वर्षी या जगाचा कायमचा निरोप घेतला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. सरोज खान यांनी आपल्या चार दशकांच्या फिल्मी करिअरमध्ये दोन हजारांहून अधिक गाणी कोरिओग्राफ केली होती. पण गेल्या दोन वर्षांत त्यांच्याकडे कामाचा तुटवडा होता. मार्च 2019 मध्ये अशी बातमी आली होती की, त्यांना इंडस्ट्रीमध्ये काम मिळत नसून त्या शास्त्रीय नृत्य शिकवून आपला उदरनिर्वाह करत आहेत.

सलमानने केली होती मदत : ही बातमी समोर आल्यानंतर सलमान खान त्यांच्या मदतीसाठी पुढे आला होता. त्याने सरोज खान यांची भेट घेतली होती. या भेटीत सलमानने त्यांना 'माझ्यासोबत काम कराल का'? असे विचारले होते. या भेटीनंतर सरोज यांनी सलमानचे कौतुक केले होते आणि त्या म्हणाल्या होत्या की - 'मी सलमानला त्याच्या शब्दासाठी ओळखते. तो जो शब्द देतो तो पूर्ण करतो.' आपले वचन पाळत सलमानने सरोज खान यांना 'दबंग 3' या चित्रपटासाठी सई मांजरेकरला ट्रेनिंग देण्याचे काम दिले होते.

कतरिनामुळे झाले होते नुकसान : सरोज खान 2018 मध्ये आलेल्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटात कतरिना कैफचा डान्स कोरिओग्राफ करणार होत्या. पण असे घडले नाही. वास्तविक, जेव्हा 'ठग्स...' चे शूटिंग सुरू झाले तेव्हा कतरिनाने ऐनवेळी सांगितले होते की, ती रिहर्सल न करता गाणे शूट करणार नाही. अशा परिस्थितीत प्रभू देवाने  सरोज  खान यांची जागा घेतली आणि प्रभू देवावर कतरिनाचे डान्स कोरिओग्राफ करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटल्यानंतर सरोज खान एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या की, "काही काळापूर्वी माझी आवड कमी झाली पण इंडस्ट्रीतील नृत्याची स्थिती पाहता मला इंडस्ट्रीसाठी काहीतरी चांगले करायचे आहे. मी अभिनेत्रींना जज करत नाही कारण त्या एखाद्याने सांिगतलेल्या डान्स मुव्स गाण्यात करत असतात, त्यामुळे तो त्यांचा दोष नाही.'

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser