आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बाजीगर'चा किस्सा:रोमँटिक सीनच्या शूटिंगदरम्यान काजोलला देता येत नव्हते योग्य एक्सप्रेशन्स, मग काय शाहरुखने काढला चिमटा आणि...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या चित्रपटात शाहरुख आणि काजोलची जोडी खूपच पसंत केली गेली होती.

शाहरुख खान आणि काजोलला बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट ऑन-स्क्रीन जोडी म्हणून ओळखले जाते. 1993 मधील अब्बास-मस्तान यांच्या बाजीगर या चित्रपटातून त्यांची जोडी प्रसिद्ध झाली होती. या चित्रपटाशी संबंधित एक रंजक किस्सा शाहरुखने काही वर्षांपूर्वी करण जोहरच्या चॅट शो 'कॉफी विथ करण' मध्ये सांगितला होता, ज्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये शाहरुख एका रोमँटिक सीनच्या शूटिंगवेळी नेमके काय घडले होते हे सांगतोय?

शाहरुखने काजोलला काढला होता चिमटा

व्हिडिओमध्ये शाहरुख सांगतोय, चित्रपटातील 'बाजीगर ओ बाजीगर' या टायटल साँगचे बोल होते - मेरा दिल था अकेला तुने खेल ऐसा खेल.. . यावर काजोलला सेंशुअस एक्सप्रेशन्स द्यायचे होते, पण ते तिला जमत नव्हते. त्यावेळी आम्ही दोघेही नवीन होतो. काजोल असे एक्सप्रेशन्स देण्याचा प्रयत्न करत होती, परंतु ते खूप नकली वाटत होते कारण नॉर्मल लाइफमध्ये असे एक्सप्रेशन्स कोणीही देत ​​नाही. मग काजोल पुढे म्हणाली, मी बरेच प्रयत्न केले पण हवे तसे एक्सप्रेशन्स मला जमतच नव्हते. कधी वेळेचा गोंधळ उडायचा तर कधी काय..

त्यावर शाहरुख पुढे म्हणाला, नंतर नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांनी हळूच मला काजोलला चिमटा काढायला सांगितला, मग काय मी तसेच केले आणि शॉट ओके झाला. हे ऐकायला वल्गर वाटत असले तरी तसे नव्हते.

या चित्रपटात शाहरुख आणि काजोलची जोडी खूपच पसंत केली गेली होती. या चित्रपटात निगेटिव्ह भूमिका साकारुन शाहरुख एका रात्रीतून स्टार झाला होता.

एकत्र दिले अनेक हिट चित्रपट

बाजीगरनंतर शाहरुख-काजोलने दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, करण अर्जुन, कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम आणि माय नेम इज खान यासारखे यशस्वी चित्रपट दिले. ऑन स्क्रीन व्यतिरिक्त, दोघे ऑफ स्क्रीन देखील खूप चांगले बॉन्डिंग शेअर करतात. शाहरुखच्या ‘झिरो’ या चित्रपटातही काजोलने गेस्ट अपिअरन्स दिला होता.

बातम्या आणखी आहेत...