आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकी-कतरिनाचे लग्न:रोका सेरेमनीची बातमी समोर आल्याने विकी आणि कतरिना यांच्यात झाले होते जोरदार भांडण, रिपोर्ट्समध्ये दावा

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कतरिना-विकी यांच्यात झाले होते भांडण

गेल्या काही दिवसांपासून कतरिना कैफ आणि विकी कौशल त्यांच्या लग्नाच्या बातम्या चर्चेत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून दोघे रिलेशनशिपमध्ये असून आता लग्न करणार असल्याचे म्हटले जात आहे. विकी आणि कतरिना या दोघांनीही लग्नाबाबत मौन बाळगले आहे. याआधी कतरिना आणि विकी यांची रोका सेरेमनी झाल्याचे वृत्त आले होते.

कतरिना-विकी यांच्यात झाले होते भांडण
मीडिया रिपोर्ट्सनुसार, विकी आणि कतरिना यांच्या रोका सेरेमनीची बातमी समोर आल्यानंतर दोघेही इतके नाराज झाले की त्यांच्यात भांडण देखील झाले होते हे बातमी प्रसारमाध्यमांपर्यंत कशी पोहोचली याबाबत दोघेही संभ्रमात होते. ही बातमी लीक होण्यास कोणाची टीम जबाबदार आहे यावरून दोघांमध्ये वाद सुरू होता कारण दोघांचे प्राधान्य चित्रपटांना आहे आणि ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहू इच्छित नाहीत.

हर्षवर्धन कपूरने केला होता खुलासा
बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धन कपूर याने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत विकी आणि कतरिनाच्या नात्याबद्दल खुलासा केला होता. मुलाखतीत हर्षवर्धनला विचारण्यात आले होते की, 'हर्षवर्धन बॉलिवूडमधल्या कोणत्या कलाकार जोडीच्या अफेअरच्या चर्चांना खरं मानतो तसेच अशा कोणत्या जोड्या आहेत ज्या फक्त लोकप्रियता मिळवण्यासाठी आहेत? या प्रश्नाचे उत्तर देताना हर्षवर्धन म्हणाला होता, 'विकी आणि कतरिना एकत्र आहेत आणि हे खरे आहे.' त्यानंतर बावचळून पटकन म्हणाला, 'हे सांगून मी कोणत्या अडचणीत तर सापडणार नाहीए ना?'

7 ते 12 डिसेंबर दरम्यान होईल लग्न
काही दिवसांपासून मीडियामध्ये अशा बातम्या येत आहेत की, विकी-कतरिना याच वर्षी लग्न करणार आहेत. सवाई माधोपूरच्या चौथ बरवाडा येथील सिक्स सेन्स बरवाडा फोर्ट हॉटेलमध्ये दोघेही लग्न करणार आहेत. सर्व कार्यक्रम 7 ते 12 डिसेंबर दरम्यान होणार आहेत. यासाठी हॉटेलचे बुकिंग आधीच झाले आहे. मात्र त्याची औपचारिक घोषणा अजून व्हायची आहे. हॉटेलनेही या व्हीआयपी लग्नाची तयारी सुरू केली आहे.

अनेक सेलिब्रिटी येतील
विकी आणि कतरिनाचा विवाहसोहळा छोटा असेल. असे असूनही या कार्यक्रमाला अनेक मोठे स्टार्स येण्याची शक्यता आहे. लग्नाचा मुख्य कार्यक्रम जनाना महलमध्ये होणार असल्याचीही माहिती मिळाली आहे.

बातम्या आणखी आहेत...