आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

32 वर्षांची झाली यामी:जेव्हा यामी गौतमने वडिलांनी सांगितली होती 'विकी डोनर'ची कथा तेव्हा अशी होती त्यांची प्रतिक्रिया

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आणि आयुष्मान-यामीचा करिअर ग्राफदेखील उंचावला.

बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम आज आपला 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. यामीने 2012 मध्ये 'विकी डोनर' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात ती आयुष्मान खुराना सोबत दिसली होती. आपल्या पहिल्याच चित्रपटात यामीने एक मोठी जोखीम पत्करली होती, कारण या चित्रपटाचा विषय सामान्य बॉलिवूड चित्रपटांपेक्षा थोडा वेगळा होता. हा चित्रपट इन्फर्टिलिटी आणि स्पर्म डोनेशन सारख्या विषयांवर होता, ज्यास भारतीय समाजात टॅबू मानले जाते.

पालकांनी विचारले होते - कोणत्या विषयावर आहे चित्रपट ?

इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह साऊथ 2018 मध्ये यामी या चित्रपटाविषयी बोलताना म्हणाली होती की, तो असा काळ होता, जेव्हा मी सतत ऑडीशन देत होते, त्यावेळी माझ्याकडे टिपिकल बॉलिवूड चित्रपट करण्याचा पर्याय होता. मी सर्वकाही स्वबळावर केले आहे. त्यावेळी कोणीही माझ्यामागे उभा नव्हता. जेव्हा मी 'विकी डोनर' साठी ऑडिशन दिले तेव्हा मी कास्टिंग डायरेक्टरला ही फिल्म कशाबद्दल आहे? विचारले होते.

कास्टिंग डायरेक्टरने माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही आणि ते फक्त हसले. जेव्हा मला हा चित्रपट मिळाला तेव्हा मला त्याच्या विषयाबद्दल माहिती मिळाली. पालकांना ही गोष्ट सांगणे गरजेचे होते. माझ्या वडिलांनी मला हा चित्रपट कशाबद्दल आहे हे विचारले आणि मी त्यांना चित्रपटाची संपूर्ण स्क्रिप्ट वाचायला दिली. जेव्हा माझ्या आईवडिलांनी स्क्रिप्ट वाचली तेव्हा त्यांची प्रतिक्रिया होती - ही खूप छान स्टोरी आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आणि आयुष्मान-यामीचा करिअर ग्राफदेखील उंचावला.

'भूत पुलिस'च्या चित्रीकरणात बिझी आहे यामी
यानंतर यामीने 'बदलापूर', 'काबिल', 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' आणि 'बाला 'या चित्रपटातही काम केले. यावर्षी, तिचा 'गिन्नी वेड्स सन्नी' हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला, ज्यामध्ये ती विक्रांत मैसीसोबत दिसली होती. सध्या यामी धर्मशाळेत 'भूत पुलिस' चित्रपटाच्या चित्रीकरणात बिझी आहे, या चित्रपटात सैफ अली खान, जॅकलिन फर्नांडिस आणि अर्जुन कपूर मुख्य भूमिकेत आहेत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser