आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Where Ever I Live In Any Corner Of The World, I Get The First Birthday Message From Bachchan Sir Every Year At Exactly 12 O'clock Ahana Kumra

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंटरव्ह्यू:'मी जगातील कोणत्याही कोप-यात असू दे, वाढदिवशी ठिक 12 वाजता पहिला मेसेज मला बच्चन सरांचा येतो' - आहना कुमरा

मुंबई (अंकिता तिवारी)एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ही वेब सीरिज 24 मे रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

शाहरुख खान निर्मित 'बेताल' या हॉरर वेब सीरिजमध्ये आहना कुमरा झळकणार आहे. या झोम्बी ड्रामात 'मुक्केबाज' चित्रपटात झळकलेला अभिनेता विनीत कुमारची साथ तिला मिळणार आहे.  महानायक अमिताभ बच्चन स्टारर 'युद्ध'द्वारे  आपल्या करिअरची सुरुवात करणा-या आहनाने दिव्य मराठीसोबतच्या खास बातचीतमध्ये बिग बींसोबतच्या तिच्या बाँडिंगविषयी सांगितले. अमिताभ तिचे गुरु आणि प्रशंसक असल्याचे तिने सांगितले.  

आहना म्हणाली- अमिताभ बच्चन यांच्यासमवेत मला 'युद्ध' नावाचा शो करण्याची संधी मिळतेय, हे समजल्यावर क्षणभर माझा विश्वासच बसले नाही. करिअरच्या सुरुवातीच्या काळातच अमिताभजी सारख्या कलाकारासोबत काम करायला मिळणे हे नशीबच आहे.  मी खूप उत्साही आणि खूप आनंदी होते. आम्ही दीड वर्ष एकत्र काम केले आणि त्यांच्याबरोबर वेळ घालवणे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे.

  • दरवर्षी सर्वप्रथम अमिताभ विश करतात

हा शो हवा तेवढा यशस्वी झाला नाही. पण शो संपल्यानंतरही दरवर्षी वाढदिवसाला सर्वप्रथम मला अमिताभ बच्चन विश करतात. गेल्या सहा वर्षांपासून मी जगाच्या कुठल्याही कोप-यात असले तरी वाढदिवशी सर्वात पहिला मेसेज त्यांचा असतो. दरवर्षी ठिक 12 वाजता पहिला बर्थडे मेसेज त्यांचा असतो. 

  • त्यांना जवळून ओळखून मला आनंद झाला

जेव्हा मी त्यांच्याबरोबर टीव्ही कार्यक्रमांचे शूटिंग करत होते, तेव्हा मला आठवते की आम्ही दृश्यापूर्वी 7-8 वेळा एकत्र रिहर्सल करायचो. अमितजी माझे सीनही डिस्कस करायचे. अनेकदा माझे सीन संपेपर्यंत ते सेटवर थांबायचे आणि माझ्या अभिनयाचे बारकाईने निरिक्षण करायचे. कुठेतरी ते कलाकार म्हणून माझा आदर करायचे, जी माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यांना जवळून जाणून घेण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य समजते. 

आहना कुमार आणि विनीत सिंग स्टारर ही वेब सीरिज 24 मे रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...