आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली लग्नाच्या तीन वर्षानंतर पहिल्यांदा आईबाबा होणार आहेत. दोघांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्याकडे गोड बातमी असल्याचे सांगितले. त्यानंतर आता पहिल्यांदाच अनुष्काने बेबी बंपचे एक छायाचित्र शेअर केले आहे. त्यावर विराटने दिलेली प्रतिक्रिया सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
अनुष्काने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर समुद्राजवळचा आपला एक फोटो शेअर केला आहे, ज्यात तिचे बेबी बंप दिसत आहे. यासह तिने लिहिले, 'जीवन निर्माण करण्याच्या अनुभवापेक्षा वास्तविक आणि सुखद काहीही नाही.'
View this post on InstagramA post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on Sep 13, 2020 at 3:49am PDT
अनुष्काने शेअर केलेले हे छायाचित्र काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. तिला तिच्या सहकलाकारांच्या शुभेच्छा मिळत आहेत. तर दुसरीकडे विराटने तिच्या या छायाचित्रावर एक सुंदर प्रतिक्रिया दिली. त्याने लिहिले, 'माझं संपूर्ण जग मला एकाच फ्रेममध्ये दिसतंय.'
View this post on InstagramAnd then, we were three! Arriving Jan 2021 ❤️🙏
A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on Aug 26, 2020 at 10:32pm PDT
अनुष्का आणि विराट यांनी 27 ऑगस्ट रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याची गोड बातमी दिली होती. जानेवारी 2021 मध्ये दोनाचे तीन होणार असल्याचे त्यांनी सांगितले. विराट-अनुष्कापूर्वी नताशा स्तानकोविक आणि हार्दिक पांड्या यांचा घरी मुलाचा जन्म झाला, त्याचे नाव अगस्त्य असे ठेवण्यात आले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.