आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मिष्टीच्या आयुष्याशी संबंधित फॅक्ट्स:वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी जगाला अलविदा केलेल्या मिष्टी मुखर्जीला आयटम नंबर्समुळे मिळाली होती प्रसिद्धी, 2014 मध्ये अडकली होती वादात

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गेल्या काही महिन्यांपासून तिला किडनीचा त्रास सुरु झाला होता..

हिंदी आणि बंगाली चित्रपटसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री मिष्टी मुखर्जी हिचे 2 ऑक्टोबर रोजी बंगळुरूमध्ये मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे निधन झाले. ती अवघ्या 27 वर्षांची होती. शुक्रवारी रात्री तिने अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही महिन्यांपासून तिला किडनीचा त्रास सुरु झाला होता.

कीटो डाएट घेतल्यामुळे तिची तब्येत ढासळल्याचे सांगण्यात येत आहे. तिच्या निधनाच्या वृत्ताने चित्रपटसृष्टीत शोकाकुल वातावरण आहे. जाणून घेऊयात मिष्टीच्या आयुष्याशी संबंधित काही खास गोष्टी...

  • मिष्टीचे खरे नाव इंद्राणी चक्रवर्ती होते. तिचा जन्म 20 डिसेंबर 1992 रोजी कोलकात्यातील एका बंगाली कुटुंबात झाला होता. मिष्टीच्या आईचे नाव बीना चक्रवर्ती असून त्या गृहिणी आहेत तर वडिलांचा बांधकाम व्यवसाय आहे. मिष्टीला अनिरुद्ध नावाचा एक भाऊ आहे.
  • मिष्टीने बंगाली चित्रपटांद्वारे आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती, त्यानंतर ती तामिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये दिसली. मिष्टीला बोल्ड आयटम नंबर्समधून प्रसिद्धी मिळाली होती. मैं कृष्णा हूं आणि लाइफ की तो लग गई या हिंदी चित्रपटांमध्ये ती सहायक अभिनेत्रीच्या रुपात झळकली होती.
  • मिष्टीने 2012 मध्ये 'लाइफ की तो लग गई' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. यानंतर, 2013 मध्ये मैं कृष्णा हूं या चित्रपटातील एका गाण्यात ती रजनीश दुग्गलसोबत दिसली होती. या चित्रपटात जूही चावला मुख्य भूमिकेत होती. तर हृतिक रोशन आणि कतरिना कैफ यांचा स्पेशल अपिअरन्स होता.

सेक्स रॅकेटमध्ये अडकले होते नाव

सेक्स रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा आरोप करण्यात आल्याने मिष्टी वादात अडकली होती.

  • 2014 मध्ये मिष्टीच्या मुंबईतील भाड्याच्या घरातून अडीच लाख रुपयांच्या पॉर्न सीडी आणि डीव्हीडी जप्त करण्यात आल्या होत्या. या प्रकरणात मिष्टीचे वडील आणि भाऊ यांनाही पोलिसांनी अश्लील साहित्य विकल्याबद्दल अटक केली होती, परंतु त्यानंतर जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली होती.
  • मिष्टीने या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण देताना म्हटले होते की, तिच्या घरी काम करणा-या चार मोलकरणींनी तिला व तिच्या कुटुंबाला यात अडकवले होते. त्या अश्लील सीडी विक्रीचा व्यवसाय करायच्या आणि जेव्हा मिष्टी कुटुंबासमवेत गोव्याला गेली गोती, तेव्हा चारही मोलकरणींनी स्वतःचा बचाव करण्यासाठी तिला आणि तिच्या कुटुंबाला यात अडकवले. नंतर घरमालकाने या संपूर्ण प्रकरणात मिष्टीची माफी मागितली आणि तिचे कुटुंब निर्दोष असल्याचे म्हटले होते.

नावातील साम्यामुळे दुस-याच अभिनेत्रीला लोकांनी वाहिली श्रद्धांजली

  • मिष्टीच्या निधनानंतर सोशल मीडियावर लोकांनी मिष्टी मुखर्जीऐवजी अभिनेत्री मिष्टी चक्रवर्तीला श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर मिष्टी चक्रवर्ती हिने आप जिवंत असल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे.
लोकांनी मिष्टी चक्रवर्ती हिला श्रद्धांजली वाहिली.
लोकांनी मिष्टी चक्रवर्ती हिला श्रद्धांजली वाहिली.
  • मिष्टी चक्रवर्तीने रविवारी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, 'काही माध्यमांच्या वृत्तानुसार माझे आज निधन झाले. पण देवाच्या कृपेने, मी निरोगी आहे आणि अजून मला खूप पुढे जायचे आहे. # चुकीची बातमी.' या पोस्टसह तिने फेक न्यूजचा एक स्क्रीनशॉटदेखील शेअर केला आहे, ज्यामध्ये गुगलवर मिष्टी मुखर्जी डेथ सर्च केल्यावर तिच्या निधनाची माहिती समोर येतेय.

बातम्या आणखी आहेत...