आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अनुराग कश्यपवर आरोप करणारी पायल कोण आहे:बॉलिवूडच्या एका फ्लॉप चित्रपटात झळकली होती पायल घोष, आईवडिलांच्या मनाविरोधात जाऊन ठेवले होते चित्रपटसृष्टीत पाऊल

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पायलचा जन्म 13 नोव्हेंबर 1989 रोजी कोलकाता येथे झाला.

बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप केल्यानंतर अभिनेत्री पायल घोष अचानक चर्चेत आली आहे. अनुराग कश्यपने माझ्यासोबत गैरवर्तन केले असून मला अत्यंत वाईट पद्धतीची वागणूक दिली असे ट्विट पायलने केले आहे. इतकेच नाही तर तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली असून 'नरेंद्र मोदीजी आपण याप्रकरणी कारवाई करावी आणि या क्रिएटिव्ह माणसाआडचा राक्षस देशाला पाहू द्या,' अशी विनंती त्यांना केली. तर अनुरागने स्वतःवरचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

हे प्रकरण समोर आल्यानंतर सर्वांच्या मनात एकच प्रश्न उपस्थित झाला आहे, तो म्हणजे ही पायल घोष आहे तरी कोण? चला तर मग जाणून घेऊयात तिच्याविषयी...

  • पायलचा जन्म 13 नोव्हेंबर 1989 रोजी कोलकाता येथे झाला.
  • कोलकाताच्या स्कॉटिश चर्च कॉलेजमधून तिे पॉलिटिकल सायन्समध्ये पदवी मिळवली.
  • 2008 मध्ये सीन बीन स्टारर ब्रिटीश टीव्ही फिल्म 'शार्प्स पेरिल'मध्येही तिने भूमिका साकारली होती. या सिनेमात तिला एक छोटीशी भूमिका मिळाली होती. याच्या ऑडीशनसाठी ती
  • आपल्या एका मित्रासोबत गेली होती. यात तिने एका बंगाली फ्रीडम फाइटरच्या मुलीची भूमिका साकारली होती, जी खेड्यात राहते.
  • त्यानंतर ती 'प्रायनम', 'वर्षाधरे' आणि 'मिस्टर रास्कल' यासह अनेक तेलुगू आणि कन्नड चित्रपटांमध्ये दिसली.

पायलने आईवडिलांच्या विरोधात जाऊन केला होता चित्रपटसृष्टीत प्रवेश

  • रिपोर्ट्सनुसार, पायलचे आई-वडील चित्रपटसृष्टीत करिअर करण्याच्या तिच्या निर्णयावर खूष नव्हते, मात्र तिने आईवडिलांच्या मनाविरुद्ध जाऊन कोलकाता सोडले मुंबई गाठली होती.
  • पायलने 2016 मध्ये टेलिव्हिजन विश्वात पाऊल ठेवले होते. 'साथ निभाना साथिया' या गाजलेल्या मालिकेत ती दिसली होती.
  • पायलने 2017 मध्ये रोमँटिक-कॉमेडी 'पटेल की पंजाबी शादी' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात ऋषी कपूर, परेश रावल, वीर दास आणि प्रेम चोप्रा देखील दिसले होते. संजय चेल दिग्दर्शित या चित्रपटात पायलने परेश रावल यांच्या मुलीची भूमिका साकारली होती. मात्र हा चित्रपट फ्लॉप ठरला होता.