आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र यांच्या घरी लवकरच सनई चौघड्यांचे सूर ऐकू येणार आहेत. त्याचे कारण म्हणजे त्यांचा नातू आणि अभिनेते सनी देओल यांचा थोरला मुलगा करण देओल लवकरच लग्नगाठीत अडकणार आहे. नुकताच करणचा साखरपुडादेखील झाला आहे. पण त्याच्या भावी वधूविषयीची फारशी माहिती समोर आली नव्हती. करणची होणारी पत्नी होण आहे, तिचे नाव काय, ती कुठे राहते, काय करते... याबाबत जाणून घेण्यास सगळेच उत्सुक आहेत. आता करणची 'मिस्ट्री गर्ल'बद्दलची माहिती समोर आली आहे. द्रिशा आचार्य हे करणच्या भावी पत्नीचे नाव आहे.
बिमल रॉय यांची पणती आहे द्रिशा
करण देओलच्या भावी पत्नीचे नाव द्रिशा आचार्य आहे. ती दुबईत वास्तव्याला असून तिथए एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये मॅनेजरपदावर ती कार्यरत आहे. विशेष म्हणजे दो बिघा जमीन, देवदास, मधुमती, काबुलीवाला या चित्रपटांसाठी ओळखले जाणारे प्रसिद्ध फिल्ममेकर बिमल रॉय यांची द्रिशा पणती असल्याचे सांगितले जात आहे. बिमल रॉय यांच्या कन्या रिंकी भट्टाचार्य यांची लेक चिमू भट्टाचार्य यांची द्रिशा कन्या आहे. या नात्याने ती बिमल रॉय यांची पणती आहे. चिमू भट्टाचार्य 1998 मध्ये दुबईत स्थायिक झाल्या. तिथेच द्रिशा लहानाची मोठी झाली.
बालपणीचे मित्र आहेत द्रिशा आणि करण
रिपोर्टनुसार, द्रिशा आचार्य आणि करण हे दोघेही बालपणीचे मित्र आहेत. दोघांचा साखरपुडा झाला असून त्यांच्या लग्नाचे ठिकणही ठरले आहे. अतिशय मोजक्या लोकांच्या उपस्थितीत दोघांचा साखरपुडा झाला. आता जून महिन्यात दोघांचे लग्न होणार असून त्यांचे लग्नाचे स्थळदेखील निश्चित झाले आहे. वांद्रे येथील 'ताज लँड्स एंड' येथे ते विवाहबंधनात अडकणार आहेत. लग्नसोहळा देखील अतिशय खासगी ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे.
प्रायव्हेट आहे द्रिशाचे इन्स्टाग्राम अकाउंट
द्रिशा सोशल मीडियावर फारशी सक्रीय दिसत नाही. तिचे इन्स्टाग्राम अकाउंटदेखील प्रायव्हेट आहे. सध्या सोशल मीडियावर द्रिशा आणि करणचे अतिशय निवडक फोटो पाहायला मिळत आहेत. अद्याप द्रिशा आणि करण यांनी त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केलेली नाही.
करणने 2019 मध्ये अभिनय क्षेत्रात केले पदार्पण
करण देओलने 2019 मध्ये सनी देओल दिग्दर्शित 'पल पल दिल के पास' या चित्रपटातून अभिनयात पदार्पण केले. याशिवाय त्याने 'यमला पगला दिवाना' या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. लवकरच करण आजोबा धर्मेंद्र, वडील सनी देओल आणि काका बॉबी देओलसोबत 'अपने-2'मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट अनिल शर्मा दिग्दर्शित करणार आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.