आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाऊ-वहिनीच्या घटस्फोटावर सुष्मिता का आहे गप्प ?:निकटवर्तीय म्हणाले - सुष्मिताला या भानगडीत पडायचे नाही

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन आणि चारू असोपा त्यांच्या नात्यामुळे सध्या चर्चेत आहेत. दोघेही घटस्फोटाच्या उंबरठ्यावर आहेत. पण सुष्मिताने तिच्या भाऊ-भावजयीच्या घटस्फोटावर अद्याप प्रतिक्रिया दिलेला नाही. ती या विषयावर गप्प का आहे, याचा खुलासा एका सूत्राने केला आहे. सुष्मिताच्या निकटवर्तीयने सांगितल्यानुसार, या प्रकरणात सुष्मिताची प्रतिक्रिया आगीत तेल ओतण्यासारखी असेल, म्हणून तिने यावर मौन बाळगण्याचे ठरवले आहे.

सुष्मिताला या भानगडीत पडायचे नाही
सुष्मिताच्या निकटवर्तीयने सांगितले, 'सुष्मिता या प्रकरणापासून दूर आहे कारण तिला या भानगडीत पडायचे नाही. दोघे एकत्र आल्यानंतर तिने प्रतिक्रिया दिली होती, पण आता ती या प्रकरणापासून स्वत:ला दूर ठेवत आहे. तिला माहीत आहे की तिची कोणतीही प्रतिक्रिया आगीत तेल ओतण्याचे काम करु शकते. ती सध्या खूप बिझी आहे, त्यामुळे ती या प्रकरणापासून अंतर ठेऊन आहे. पण यावरून तिला तिचा भाऊ आणि वहिनी चारूची काळजी नाही असे नाही.'

सुष्मिताची चारूसोबत चांगली बाँडिंग
सुष्मिताच्या निकटवर्तीयाने पुढे सांगितल्यानुसार, 'सुष्मिताचे चारूसोबत खास बाँडिग आहे आणि त्यांची मैत्री कायम राहावी अशी तिची इच्छा आहे. सुष्मिताच्या मुलींनी राजीव-चारुची लेक जियानाच्या वाढदिवसाला हजेरी लावली आणि तिचे लाड केले, यावरुन सर्वजण चारूच्या बाजुने उभे असल्याचे सिद्ध होते.'

राजीवने चारूवर एक-दोनदा हात उचलला आहे
अलीकडेच चारूने राजीववर गंभीर आरोप केले होते. आठ महिन्यांची गरोदर असताना राजीवने आपली फसवणूक केल्याचा खुलासा तिने केला होता. राजीवच्या बॅगेतून अशी काही वस्तू सापडल्या होत्या, ज्यावरुन राजीव आपली फसवणूक करत असल्याचे तिला पटले होते. राजीवने अनेकदा शिवीगाळ करत मारहाण केल्याचा गंभीर आरोप चारूने केला होता.

लग्नानंतर अनेकदा वादात सापडले
चारू आणि राजीव यांचे 2019 मध्ये लग्न झाले. 2021 मध्ये या जोडप्याच्या मुलीचा जन्म झाला, जिचे नाव जिआना आहे. लग्नाच्या काही दिवसांनी दोघांमध्ये मतभेद सुरु झाले. 2022 मध्ये चारूने स्पष्ट केले की, ती राजीवला घटस्फोट देणार आहे, त्यानंतर ती वेगळ्या घरात राहू लागली. यावर्षी गणेशोत्सवात दोघांचे एकत्र फोटो समोर आले होते, त्यावरुन दोघांमध्ये पॅचअप झाल्याचे म्हटले गेले होते. पण आता दोघेही पुन्हा विभक्त झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...