आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

का तुटली होती सलीम-जावेद यांची जोडी:सलीम-जावेद यांच्या मैत्रीवर झोया अख्तर बनवणार माहितीपट, अमिताभ बच्चनमुळे तुटली होती यांची जोडी

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घ्या नेमके काय झाले होते...

हिंदी सिनेमात लेखकांची जोडी म्हणजे सलीम-जावेद यांच्या मैत्रीवर आणि जीवनावर एक माहितीपट बनणार असल्याची चर्चा होती. हा माहितीपट जावेद अख्तर यांची कन्या आणि दिग्दर्शिका झोया अख्तर बनवणार आहे. याचे निमित्त साधत दिव्य मराठीने स्वत: सलीम खान यांना याविषयी विचारले. यावर सलीम साहेब म्हणाले, ही बातमी अगदी खरी आहे. झोयाने एक ते दीड महिन्यापूर्वी ही कल्पना सांगितली होती. यासाठी झोयाने रिसर्चदेखील सुरू केले आहे. आमच्यासोबत ज्या लोकांनी काम केले आहे, त्यांच्याशी ती बोलणार आहे. यावर खूप दिवस लागतील. हा बायोपिक नसेल मात्र माहितीपटासारखा असेल. यात आमच्या कामाविषयी माहिती दिली जाईल. याच्या शूटिंगमध्ये अजून वेळ आहे. यातील माहिती आतापर्यंत कुठे ऐकली किंवा वाचली नसेल.

या दोघांच्या जोडीने लेखक म्हणून सिनेसृष्टीला सुमारे 22 चित्रपट दिले. यातील अर्ध्यापेक्षा जास्त चित्रपट अमिताभ बच्चन यांच्यासोबतच होते. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर, अमिताभ यांचे करियर बनवण्यामागे या जोडीचा खूप मोठा वाटा आहे. पण तुम्हाला माहित आहे का, ही जोडी तुटण्यामागचे कारण अमिताभ बच्चन हेच होते.

जेव्हा जावेद अख्तर सहन करू शकले नाही आपला अपमान
पत्रकार अनिता पाध्ये यांनी आपल्या 'यही रंग यही रूप' या पुस्तकात सलीम-जावेद यांच्या प्रोफेशनल ब्रेकअपची कहाणी लिहिली आहे. त्यांनी लिहिले, या लेखक जोडीने अमिताभ बच्चन यांना एका चित्रपटाच्या स्क्रिप्टसोबत अप्रोच केले, जो नंतर 'मिस्टर इंडिया' नावाने बनला. अमिताभ यांना चित्रपटातील अदृश्य माणसाची कॉन्सेप्ट आवडली नाही. लोक मला पडद्यावर पाहायला येतात, फक्त आवाज कोण ऐकणार, असे सांगत बिग बींनी ही ऑफर नाकारली. अमिताभ बच्चन यांचा आवाज या चित्रपटासाठी परफेक्ट असेल, हा विचार करुन सलीम-जावेद अमिताभ बच्चन यांच्याकडे गेले होते. मात्र बिग बींनी त्यांना निराश केले.

पुस्तकात असलेल्या उल्लेखानुसार, "या अपमानानंतर आपल्या जोडीने बिग बींसोबत काम करु नये, असे जावेद अख्तर यांचे मत होते. पण सलीम खान त्यांच्या निर्णयाशी पुर्ण सहमत नव्हते. काही दिवसांनी जावेद अख्तर हे अमिताभ यांच्या होळी पार्टीत गेले आणि त्यांना म्हणाले की, सलीम खान त्यांच्यासोबत कधीच काम करू इच्छित नाहीत. या गैरसमजामुळे या जोडीचे व्यावहारिक संबंध बिघडले आणि त्यानंतर त्यांनी कधीच एकत्र काम केले नाही." तर दुसरीकडे अमिताभ बच्चन यांनी मिस्टर इंडिया या चित्रपटाची ऑफर नाकारल्यानंतर हा चित्रपट अनिल कपूर यांच्याकडे गेला. 'मिस्टर इंडिया' हा चित्रपट 1987 च्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे.

सलीम-जावेद यांनी बिग बींसाठी हे चित्रपट लिहिले...
अमिताभ बच्चन 1973 हे ज्या चित्रपटामुळे एका रात्रीत सुपरस्टार बनले आणि अँग्री यंगमॅन या नावाने नवी ओळख मिळवली, तो चित्रपट म्हणजे 'जंजीर'. हा चित्रपटही सलीम-जावेद यांनीच लिहिला होता. हेदेखील म्हणले जाते की, सलीम-जावेद यांच्या शिफारसीनंतरच प्रकाश मेहरा यांनी अमिताभ यांना या फिल्मसाठी कास्ट केले होते. 'जंजीर' व्यतिरिक्त अमिताभ यांचे 'मजबूर' (1974), 'दीवार' (1975), 'शोले' (1975), 'ईमान धरम' (1977). 'त्रिशूल' (1978), 'डॉन' (1978), 'काला पत्थर' (1979), 'दोस्ताना' (1980), 'शान' (1980) आणि 'शक्ति' (1982) हे चित्रपटही सलीम-जावेद यांच्याच जोडीने लिहिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...