आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या घरी पाठवण्याचे काम करणारा अभिनेता सोनू सूदने अलीकडेच अशा एका व्यक्तीची मदत केली, ज्याच्या पत्नीचे वाराणसीत निधन झाले. सोनूने या व्यक्तीची मुंबईहून वाराणसीत पोहोचवण्याची व्यवस्था केली.
सोनूच्या एका चाहत्याने ट्विटरवर त्याला याविषयी माहिती दिली होती. चाहत्याने ट्विट केले होते, 'प्रिय सोनू सूद सर, मुंबईतील माझे शेजारी श्री. सीताराम यांच्या पत्नीचे वाराणसीत निधन झाले आहे. सीताराम आणि त्यांच्या कुटुंबातील तीन सदस्यांना त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी वाराणसीला जायचे आहे. सर, कृपया मदत करा. कारण आम्हाला तुमच्याशिवाय इतर कोणाचाही आधार नाही, म्हणून तुम्हाला मदत मागितली', असे या व्यक्तीने सोनूला म्हटले.
सोनूने प्रत्युत्तर दिले: सोनूने आपल्या चाहत्याच्या ट्विटला प्रत्युत्तर दिले आणि लिहिले, मी उद्या त्यांना पाठवतो. ते शक्य तितक्या लवकर तेथे पोहोचतील.
I am sorry for the loss. 🙏 will send him tomorrow. He will reach his home soon. God bless. https://t.co/s6cjHOq819
— sonu sood (@SonuSood) June 10, 2020
यापूर्वी सोनूने एका वृद्ध व्यक्तीला मदत केली होती. त्याच्या शेजा-याने सोनूला ट्वीट करून सांगितले होते, 'सोनू सूद सर आमच्या घराशेजारी एक वृद्ध राहतात. त्यांना त्यांच्या कुटूंबाकडे जायचे आहे. आम्ही खूप प्रयत्न केला पण ट्रेन किंवा बस सापडली नाही. त्यांना गोरखपूरला जायचे आहे तर तुम्ही त्यांना घरी पोहोचण्यास मदत कराल का?'
या ट्विटवर सोनूने लगेच उत्तर दिले होते. उद्या घरी जाणार का? त्यांची काळजी घेण्यासाठी कुणी सोबत जायला तयार आहे का? डिटेल्स पाठवा, असे सोनूने ट्विटमध्ये म्हटले होते.
कल जाएँगे घर ? कोई है जो उनका ख़्याल रखने के लिए साथ में जाए? डिटेल्ज़ भेजें। https://t.co/gP0mf9wqKG
— sonu sood (@SonuSood) June 10, 2020
सोनू सूद गेल्या दीड महिन्यापासून स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी पाठवण्याच्या कामात गुंतला आहे. बस, ट्रेन, विमानाच्या मदतीने सोनूने या मजुरांना घरी पाठवतोय.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.