आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेता इरफान खानला या जगाचा निरोप घेऊन 29 मे रोजी एक महिना पूर्ण झाला आहे. त्याची पत्नी सुतापाने त्याची आठवण म्हणून सोशल मीडियावर काही छायाचित्रे आणि एक भाविनक नोट शेअर केली. सुतापाने लिहिले, 'येथून खूप दूर... चुक आणि बरोबरच्याही खूप पुढे एक सुंदर रिकामे मैदान आहे. जेथे आपला आत्मा गवतावर शांतपणे विश्रांती घेत असेल आणि जगाच्या गप्पा मारुन थकले असेल. ही फक्त काही काळाची बाब आहे. भेटू… बोलू… पुन्हा भेट होईपर्यंत...
सुतापाने इरफानबरोबरचा जो फोटो शेअर केला आहेत त्यात ते दोघे सेल्फी काढताना दिसत आहे. तर गवतावर विश्रांती घेत असलेल्या इरफानचे छायाचित्र सुतापाने क्लिक केलेले आहे.
कोलोन संसर्गामुळे झाला मृत्यू: इरफानने 29 एप्रिल रोजी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सुमारे आठवडाभरापूर्वी कोलोनच्या संसर्गामुळे त्याला तेथे दाखल करण्यात आले होते आणि आयसीयूमध्ये त्याच्यावर उपचार सुरु होते. 13 मार्च रोजी रिलीज झालेला 'अंग्रेजी मीडियम' हा त्याचा शेवटचा चित्रपट आहे.
इरफान न्यूरोएन्डोक्राइन कर्करोगाशी झुंज देत होता: मार्च 2018 मध्ये इरफान खान न्यूरो-एंडोक्राइन ट्यूमरच्या उपचारांसाठी लंडनला गेला होता. तो तेथे जवळपास एक वर्ष राहिला आणि बरे झाल्यानंतर एप्रिल 2019 मध्ये भारतात परतला होता. परत आल्यानंतर त्याने राजस्थानमध्ये ‘अंग्रेजी मीडियम’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली होती आणि त्यानंतर पुढील शेड्युलसाठी लंडनला गेला, तिथेही तो डॉक्टरांच्या संपर्कात होता. त्यानंतर तो अनेकदा डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी लंडनला येणेजाणे करत राहिला. मात्र, लॉकडाऊनमुळे तो मुंबईबाहेर जाऊ शकला नव्हता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.