आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'लाल बत्ती' मध्ये झळकणार नाना पाटेकर:प्रकाश झा यांच्या आगामी सीरिजमधून करणार कमबॅक; साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवुड क्षेत्रात आपल्या नावाचा आगळा वेगळा ठसा उमटवणारे अभिनेते म्हणजे नाना पाटेकर. या मराठी अभिनेत्याने केवळ अभिनय, संवाद फेकीच्या जोरावर बॉलिवुडमध्ये स्वता:ची वेगळीच झाप उमटवली आहे. नाना पाटेकर फिल्म इंडस्ट्रीत खूप प्रसिद्ध आहेत. असे असताना नाना पाटेकर पुन्हा पडद्यावर दिसणार आहे. ‘लाल बत्ती’या वेब सीरीजमधून नाना पाटेकर पुन्हा पुनरागम करत आहे. प्रकाश झा यांची ही वेब सीरीज आहे.

प्रकाश झा सोबत करणार काम

नाना पाटेकर यांनी त्यांच्या कमबॅक प्रोजेक्टबाबत अनेक खुलासे केले आहे. प्रकाश झा यांच्या वेब सीरिजमधून मी पुनरागमन करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र, ही वेब सीरिज ‘आश्रम’ नसून ‘लाल बत्ती’ असणार आहे. मीडिया रिपोर्ट नुसार, ‘लाल बत्ती’ ही सामाजिक राजकीय वेब सीरिज असणार असून, या मालिकेद्वारे नाना पाटेकर आणि प्रकाश झा पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत.

‘लाल बत्ती’मध्ये दिसणार नाना पाटेकर

यापूर्वी दोघांनी 'राजनीती' चित्रपटात एकत्र काम केले होते. नाना पाटेकर यांनी स्वतः या प्रोजेक्टबद्दल माहिती दिली आहे. ते स्वतः म्हणाले की, हो मी तो प्रोजेक्ट करत आहे. ‘लाल बत्ती’ ही अशीच एक वेब सीरिज आहे, जी राजकारणाची काही काळी सत्य उघड करेल. या वेब सीरिजमध्ये नाना पाटेकर एका राजकारण्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. नाना हे बॉलिवूडचे एक दमदार अभिनेते आहेत आणि त्यांच्या पुनरागमनाची बातमी त्यांच्या चाहत्यांना नक्कीच सुखावणारी आहे.

वेबविश्वात पदार्पण करण्यासाठी सज्ज

प्रकाश झा यांच्या आगामी 'लालबत्ती' वेबसिरिजच्या निमित्ताने अभिनेते नाना पाटेकर हे वेबविश्वात पदार्पण करत आहेत. नाना पाटेकर यांनी याआधी प्रकाश झा यांच्या 'अपहरण' आणि 'राजनीती' या चित्रपटांत काम केले आहे. यानंतर प्रकाश झा यांच्यासोबत ते आगामी 'लालबत्ती' या वेबसिरीजमध्ये ते पुन्हा एकदा एकत्र येत आहेत.

बातम्या आणखी आहेत...