आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकादमीची कारवाई:अभिनेता विल स्मिथने दिला मोशन पिक्चर अकॅडमीचा राजीनामा, अध्यक्ष म्हणाले - शिस्तभंगाची कारवाई करणार

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विलवर कारवाई करणार

हॉलिवूड स्टार विल स्मिथने अकॅडमी ऑफ मोशन पिक्चरचा राजीनामा दिला आहे. 94 व्या ऑस्कर सोहळ्यात विनोदी अभिनेता ख्रिस रॉकला थापड मारल्याने विल चर्चेत आला. बोर्ड जो काही निर्णय घेईल तो मला मान्य असेल असे विल स्मिथ म्हणाला आहे. तर अकादमीने त्याचा राजीनामा स्वीकारला असून शिस्तभंगाची कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे.

मी अकादमीचा विश्वासघात केला आहे: विल
राजीनाम्यानंतर दिलेल्या निवेदनात विल म्हणाला, "मी जे वागलो त्याबद्दल कोणतेही परिणाम भोगायला मी तयार आहे. 94 व्या ऑस्कर सोहळ्यात मी जे केले ते अतिशय लाजिरवाणे आणि धक्कादायक होते. ज्यांना मी वेदना दिल्या त्यांची यादी खूप मोठी आहे. या यादीत ख्रिसच्या नावाचाही समावेश आहे. अकादमीचा मी विश्वासघात केला आहे. सोहळ्यात माझ्यामुळे इतर विजेत्यांना आनंद साजरा करण्याची संधी मिळाली नाही," असे विलने म्हटले आहे.

विलवर कारवाई करणार
फिल्म अकादमीचे अध्यक्ष डेव्हिड रुबिन यांनी विल स्मिथच्या राजीनाम्यानंतर सांगितले की, आम्ही विलचा राजीनामा स्वीकारला आहे. विलने सोहळ्यात केलेल्या हिंसाचारावरही आम्ही शिस्तभंगाची कारवाई करू. यासाठी 18 एप्रिल रोजी बोर्डाची बैठक आहे.

ऑस्कर सोहळ्यात नेमके काय घडले होते ?
यंदाच्या ऑस्करमध्ये अभिनेता विल स्मिथला त्याच्या 'किंग रिचर्ड' चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर मिळाला आहे. पण, हा पुरस्कार मिळवण्यापूर्वी त्याचे शोचा अँकर ख्रिस रॉकसोबत वाद झाला. विलने चक्क ख्रिसच्या थोबाडीत लगावली होती. झाले असे की, ऑस्कर सोहळ्यात ख्रिस रॉकने अभिनेता विल स्मिथची पत्नी जॅडा स्मिथची खिल्ली उडवली होती. पण त्याची ही मस्करी स्मिथला सहन झाली नाही आणि त्याने मंचावर येत ख्रिसच्या कानशिलात लगावली होती.

रॉकने G.I Jane 2 या चित्रपटाबाबत बोलताना स्मिथची पत्नी जॅडा पिंकेट स्मिथची मस्करी केली होती. यावेळी जॅडाच्या डोक्यावर कमी केस असल्यामुळे तिला हा चित्रपट मिळाला, अशी कमेंट ख्रिसने केली होती. यावरुन विल स्मिथ भडकला आणि त्याने रॉकच्या थोबाडीत लगावली होती. यानंतर विलने ख्रिस रॉकला पुन्हा माझ्या पत्नीचे नाव घेऊ नको, अशी चेतावणी दिली होती. ख्रिसला त्याच्या चुकीची जाणीव झाली आणि त्याने पुन्हा कधीही असे वागणार नाही, म्हणत माफी मागितली होती. इतकेच नाही तर विल स्मिथनेही घडलेल्या प्रकरावर सगळ्यांची माफी मागितली होती.

या सोहळ्यात उपस्थित सेलिब्रिटींना सुरुवातीला हा विनोद वाटला, पण नंतर वातावरण गंभीर झाले. जॅडा हिचे कमी केस हे कोणतीही स्टाइल नसून ती Alopecia नावाच्या टकल पडण्याच्या एका आजारामुळे ती त्रस्त आहे. त्यामुळे तिच्या डोक्यावर केस नाहीत.

पोस्ट शेअर करून विलने मागितली होती जाहीर माफी
घडलेल्या घटनेनंतर विलने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत जाहीर माफी मागितली होती. त्याने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले होते, "कोणत्याही स्वरूपात होणारी हिंसा ही विषारी आणि विनाशकारी असते. काल रात्रीच्या अकादमी पुरस्कार सोहळ्यातील माझे वर्तन अस्वीकार्य आणि अक्षम्य होते. माझ्या खर्चाची खिल्ली उडवणे हा माझ्या कामाचा भाग आहे. पण पत्नी जॅडाच्या वैद्यकीय स्थितीची खिल्ली उडवण्यात आल्यानंतर माझ्या सहनशक्तीचा अंत झाला आणि मी भावनेच्या भरात ते पाऊल उचलले. ख्रिस या प्रकरणानंतर मला तुझी जाहीरपणे माफी मागायची आहे. मी माझी हद्द ओलांडली. मी चुकीचा होतो. मला याची लाज वाटत आहे. मी काल केलेली ही कृती मला जो माणूस व्हायचे आहे, त्यासाठी योग्य नाही. प्रेम आणि दयाळूपणाच्या जगात हिंसेला स्थान नाही. मी अकादमीची, शोचे निर्माते, सर्व उपस्थित आणि जगभरात हा कार्यक्रम पाहणाऱ्या प्रत्येकाची जाहीर माफी मागू इच्छितो. माझ्या वागण्याने या सुंदर प्रवासावर एक डाग पडला आहे, याचा मला मनापासून खेद वाटतो."

बातम्या आणखी आहेत...