आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'थापड' कॉन्ट्रोव्हर्सीनंतर रिअ‍ॅक्शन:स्मिथची पत्नी जॅडा पिंकेट स्मिथने शेअर केली खास पोस्ट, अभिनेत्याची आई म्हणाली – मी त्याला यापूर्वी कधीही असे वागताना पाहिले नाही

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जॅडा पिंकेट स्मिथच्या या अर्थपूर्ण पोस्टची जोरदार चर्चा होत आहे.

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात अभिनेता विल स्मिथने कार्यक्रमाचा अँकर आणि कॉमेडियन ख्रिस रॉकला थोबाडीत लगावली, ज्याची सगळीकडे चर्चा होत आहे. या घटनेच्या दोन दिवसांनंतर आता विल स्मिथची आई कॅरोलिन ब्राइट आणि पत्नी जॅडा पिंकेट स्मिथ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. जॅडाने सोशल मीडियावर या घटनेवर अप्रत्यक्षपणे व्यक्त झाली आहे.

जॅडा पिंकेट स्मिथची प्रतिक्रिया
या घटनेच्या दोन दिवसांनी जॅडाने इन्स्टाग्राम पोस्ट करून या प्रकरणावर मौन सोडले आहे. जॅडाने पोस्टमध्ये लिहिले, 'हा उपचारांचा हंगाम आहे आणि त्यासाठी मी इथे आले आहे.' तिने तिच्या कॅप्शनमध्ये हृदय आणि हात जोडलेल्या इमोजींचाही समावेश केलाय. जॅडाच्या या सखोल अर्थपूर्ण पोस्टमध्ये तिने कोणाचे नाव घेतलेले दिसत नाहीय. मात्र, तिच्या या अर्थपूर्ण पोस्टची जोरदार चर्चा होत आहे.

आई म्हणाली - मी त्याला असे करताना यापूर्वी कधीही पाहिले नाही
जॅडा व्यतिरिक्त, विल स्मिथची आई कॅरोलिन ब्राइट यांनी देखील या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, "विल हा खूप शांत आणि मनमिळावू व्यक्ती आहे. मी त्याला पहिल्यांदाच एवढे चिडताना पाहिले. त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच... मी त्याला असे करताना कधीच पाहिले नव्हते.

घटनेनंतर विलने ख्रिस रॉकची मागितली जाहीर माफी
'किंग रिचर्ड' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर स्वीकारताना विल स्मिथ भावूक झाला होता. टेनिस खेळाडू सेरेना विलियम्स आणि वीनस विलियम्स यांचे वडील रिचर्ड विलियम्स यांची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. पुरस्कार स्वीकारल्यानंतर विल स्मिथ म्हणाला होता, “रिचर्ड विलियम्स हे त्यांच्या कुटुंबाचे रक्षक होते. माझ्या आयुष्यातील यावेळी देवाने मला या जगात काय करण्यासाठी बोलावले आहे, हे पाहून मी भारावलो आहे. मला अकादमीची माफी मागायची आहे. बाकी नामांकन मिळलेल्या लोकांची मला माफी मागायची आहे. हा एक सुंदर क्षण आहे आणि खरं सांगायचं तर आज मी ऑस्कर जिंकलो म्हणून रडत नाही तर आज जे झालं त्यासाठी हे आहे. मी रिचर्ड विलियम्स यांच्यासारखाच वेड्या वडिलांसारखा आहे. प्रेम तुम्हाला अशा गोष्टी करण्यास भाग पाडतो.” आशा करतो की अकादमी मला पुन्हा आमंत्रित करेल, असे स्मिथ शेवटी म्हणाला होता.

इतकेच नाही तर विलने त्याच्या इन्स्टाग्राम एक पोस्ट शेअर करत घडलेल्या घटनेवर भाष्य केले होते. विलने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले होते, "कोणत्याही स्वरूपात होणारी हिंसा ही विषारी आणि विनाशकारी असते. काल रात्रीच्या अकादमी पुरस्कार सोहळ्यातील माझे वर्तन अस्वीकार्य आणि अक्षम्य होते. माझ्या खर्चाची खिल्ली उडवणे हा माझ्या कामाचा भाग आहे. पण पत्नी जॅडाच्या वैद्यकीय स्थितीची खिल्ली उडवण्यात आल्यानंतर माझ्या सहनशक्तीचा अंत झाला आणि मी भावनेच्या भरात ते पाऊल उचलले. ख्रिस या प्रकरणानंतर मला तुझी जाहीरपणे माफी मागायची आहे. मी माझी हद्द ओलांडली. मी चुकीचा होतो. मला याची लाज वाटत आहे. मी काल केलेली ही कृती मला जो माणूस व्हायचे आहे, त्यासाठी योग्य नाही. प्रेम आणि दयाळूपणाच्या जगात हिंसेला स्थान नाही. मी अकादमीची, शोचे निर्माते, सर्व उपस्थित आणि जगभरात हा कार्यक्रम पाहणाऱ्या प्रत्येकाची जाहीर माफी मागू इच्छितो. माझ्या वागण्याने या सुंदर प्रवासावर एक डाग पडला आहे, याचा मला मनापासून खेद वाटतो."

जॅडाच्या टकलेपणाची ख्रिसने उडवली होती खल्ली
यंदाच्या ऑस्करमध्ये अभिनेता विल स्मिथला त्याच्या 'किंग रिचर्ड' चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर मिळाला आहे. पण, हा पुरस्कार मिळवण्यापूर्वी त्याचे शोचा अँकर ख्रिस रॉकसोबत वाद झाला. विलने चक्क ख्रिसच्या थोबाडीत लगावली होती. झाले असे की, ऑस्कर सोहळ्यात ख्रिस रॉकने अभिनेता विल स्मिथची पत्नी जॅडा स्मिथची खिल्ली उडवली होती. पण त्याची ही मस्करी स्मिथला सहन झाली नाही आणि त्याने मंचावर येत ख्रिसच्या कानशिलात लगावली होती. रॉकने G.I Jane 2 या चित्रपटाबाबत बोलताना स्मिथची पत्नी जॅडा पिंकेट स्मिथची मस्करी केली होती. यावेळी जॅडाच्या डोक्यावर कमी केस असल्यामुळे तिला हा चित्रपट मिळाला, अशी कमेंट ख्रिसने केली होती. यावरुन विल स्मिथ भडकला आणि त्याने रॉकच्या थोबाडीत लगावली होती.

यानंतर विलने ख्रिस रॉकला पुन्हा माझ्या पत्नीचे नाव घेऊ नको, अशी चेतावणी दिली होती. ख्रिसला त्याच्या चुकीची जाणीव झाली आणि त्याने पुन्हा कधीही असे वागणार नाही, म्हणत माफी मागितली होती. इतकेच नाही तर विल स्मिथनेही घडलेल्या प्रकरावर सगळ्यांची माफी मागितली होती.

विलची पत्नी या आजाराशी झुंज देत आहे
या सोहळ्यात उपस्थित सेलिब्रिटींना सुरुवातीला हा विनोद वाटला, पण नंतर वातावरण गंभीर झाले. जॅडा हिचे कमी केस हे कोणतीही स्टाइल नसून ती Alopecia नावाच्या टकल पडण्याच्या एका आजारामुळे ती त्रस्त आहे. त्यामुळे तिच्या डोक्यावर केस नाहीत.

50 वर्षीय जॅडाने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये आपल्या आजाराविषयी सांगितले होते. ती म्हणाली होती, "आज मला अनेक लोक विचारतात की मी केसांचा टोप का लावते, मात्र त्यांना माझ्या आजारपणाविषयी माहिती नाही. सध्या मी एका वेगळ्या आजापणातून जाते आहे. त्या आजारात माझे केस गेले आहेत. मी याविषयी यापूर्वी कुणाला काही सांगितले नव्हते. जेव्हा मला कळले की मला तो आजार झाला आहे तेव्हा मी खूप घाबरुन गेले होते. विलकडून मला खूप सपोर्ट मिळाला आहे."

बातम्या आणखी आहेत...