आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इनसाइड डिटेल्स:350 ज्युनियर आर्टिस्टसह ‘सर्कस'च्या शेवटच्या टप्प्याचे चित्रीकरण पूर्ण, रणवीर दाखवणार अद्भुत शक्तीची जादू

मुंबई / अमित कर्ण9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

र णवीर सिंह लवकरच रोहित शेट्टींच्या चित्रपटात झळकणार आहे. ‘सर्कस' हे त्याचे नाव. चित्रपटाच्या शेवटच्या टप्प्याचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. रोहित आणि चित्रपटाशी निगडित सूत्रांनी खास माहिती सांगितली. त्यांनी सांगितले...‘रणवीर सिंहवर सध्या न्यूड फोटोशूट प्रकरणात कायदेशीर कारवाईची टांगती तलवार आहे. मात्र, सेटवर तो बिनधास्त दिसतो. गेल्या आठवड्यात त्याने रोहित शेट्टींच्या सर्कसचे चित्रीकरण पूर्ण केले. तो चित्रपटाचा प्री-क्लायमॅक्स पोर्शन होता. त्यात रणवीरने सर्कसच्या मंचावरील अभिनय साकारला आहे. रोहित यांनी ‘बोल बच्चन’प्रमाणेच मूळ चित्रपट फ्रेम टू फ्रेम कॉपी केली नाही. तेथे मूळ चित्रपट होता ‘गोलमाल’. येथे ‘अंगूर’ हा मूळ चित्रपट आहे.

सर्कस कंपनी संचालकाच्या भूमिकेत दिसणार रणवीर सूत्रांनी फ्रेम टू फ्रेम कॉपी न झाल्याचा दावा केला. त्यांनी सांगितले की, ‘अंगूर’मध्ये संजीवकुमार यांचे पात्र धन्ना सेठ आणि एक गुप्तहेराचे होते. येथे रणवीर दुहेरी भूमिकेत आहे. मात्र त्याचा संबंध सर्कस कंपनीशी आहे. सर्कस कंपनीचा संचालक म्हणून रणवीरच्या एका पात्राकडे अद्भुत शक्ती आहे. येथे रणवीरकडे इलेक्ट्रिक एनर्जीची शक्ती आहे. ती शक्ती लहान भावाची भूमिका करणाऱ्या रणवीरकडे असते. सर्कसबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

‘जुडवां’तील सलमानच्या भूमिकेप्रमाणे रणवीरच्या सर्कसमधील भूमिकेत साम्य रोहित आणि रणवीरच्या निकटच्या लोकांनी दुसरा एक रंजक पैलू सांगितला. ते म्हणाले की, सलमान खानचा जुडवा आणि सर्कसमध्ये काही गोष्टीत साम्य आहे. उदा. एका भावाला मारले तर दुसऱ्याला वेदना होतात. त्याच पद्धतीने वरुण शर्माच्या भूमिकेतही मागील चित्रपटातील पात्रे रंजक पद्धतीने साकारण्यात आली आहेत. मेकर्स आणि रणवीरने काही दृश्यांचे चित्रीकरण पूर्ण केले. प्रेक्षकांची मोठी संख्या दाखवण्यासाठी ३५० ज्युनिअर आर्टिस्टसह हे चित्रीकरण करण्यात आले. त्याचे प्रॉडक्शन कॉस्ट १-२ कोटी असल्याचे समजते. रणवीरशिवाय सर्कसच्या दुसऱ्या भागातील सायक्लर, जगलर, जोकर बनलेले कलाकारही चित्रीकरणात सहभागी झाले होते. रोहित शेट्टी यांनी यासाठी देश-विदेशातल्या सर्कसमधील जिम्नॅस्ट्सना खास निमंत्रित केले होते.’

सिद्धार्थच्या प्रमुख भूमिकेतील ‘इंडियन पुलिस फोर्स’च्या दुसऱ्या टप्प्याचे शूटिंग दरम्यान, रोहित शेट्टी यांचा डिजिटल डेब्यू असणाऱ्या ‘इंडियन पुलिस फोर्स’च्या दुसऱ्या टप्प्याचेही चित्रीकरण सुरू झाले आहे. १ ऑगस्टपासून हे चित्रीकरण सुरू झाले आहे. सप्टेंबरपर्यंत ते पूर्ण करण्यात येणार आहे. त्याचे आठ भाग बनत आहेत. सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत आहे. ही मालिका पुढच्या वर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. ख्रिसमसला ‘सर्कस’ प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर रोहित ‘इंडियन पुलिस फोर्स’च्या प्रमोशनची तयार करतील. त्यानंतर रोहितचा पुढचा प्रोजेक्ट ‘सिंघम ३’ असणार आहे. ‘सर्कस’मध्ये रोहित शेट्टींनी निकितीन धीर यांनाही समाविष्ट केले आहे.

बातम्या आणखी आहेत...