आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुलासा:सारा नावाची तरुणी म्हणाली - सुशांतसारखी होऊ शकते मोहित रैनाची अवस्था, या दाव्यावर स्वतः मोहित म्हणाला - 'कोणतीही धमकी मिळाली नाही, मी अगदी फिट अँड फाइन'

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या अफवामुळे ‘दिव्य मराठी’ने थेट मोहित रैनाशी संपर्क केला.

टीव्हीचा 'महादेव', 'उरी : द सर्जिकल स्ट्राइक' हा चित्रपट आणि 'काफिर' या वेब सीरिजमधून एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीत प्रसिद्ध झालेला अभिनेता मोहित रैनाबद्दल एक धक्कादायक दावा करण्यात आला आहे. मोहित रैनाबद्दल त्याची कथित स्वयंघोषित शुभचिंतक सारा शर्मा हिने सोशल मीडियावर सेव्ह मोहित मोहीमही चालवली आहे. तिच्या म्हणण्यानुसार, माेहितच्या जिवाला धोका आहे. सुशांत सिंह राजपूतप्रमाणे मोहित रैनाचा मृत्यू होऊ शकतो. या अफवामुळे ‘दिव्य मराठी’ने थेट मोहित रैनाशी संपर्क केला. मात्र त्याने मी अगदी फिट आणि फाइन असल्याचे सांगितले. मला काही धमकी मिळाली नाही. प्रकरण सध्या कोर्टात आहे. त्यामुळे धमकीविषयी जास्त बोलू शकत नसल्याचे तो म्हणाला.

सारा नावाच्या तरुणीने सोशल मीडियावर कॅम्पेन चालवले आणि मोहितसोबतच माझ्या जीवालाही धोका आहे, असे ती म्हणाली. या लढ्यात जर मला काही झाले, तर तुम्ही हा लढा सुरु ठेवा, असे आवाहन तिने लोकांना केले आहे. मोहितने स्वतः या तरुणीला त्याचा जीवाला धोका असल्याचे सांगितले होते, असा दावा या तरुणीने केला आहे.

मी बरा आहे - मोहित

मोहित म्हणाला, मी खरचं खूप भाग्यवान आहे. सध्या तरी मी बरा आहे. आयसोलेशनमध्ये आहे. बरं वाटत आहे. त्यामुळे मला कुणालाच भेटण्याची परवानगी नाही. मी सध्या पोस्ट रिकवरी स्टेजवर आहे. माझ्यासाठी काळजी आणि चिंता वाटल्याने मी तुमचा आभार आहे.

मोहित रैनाने मेदांताचे प्रिस्क्रिप्शनदेखील दिव्य मराठीला दाखवले. त्यात 12 मे रोजीची तारीख दिसत आहे. डाॅक्टर इला पांडे यांचा उपचार सुरू असल्याचे लिहिले आहे. त्यामुळे आम्ही मेदांताच्या हेल्प लाइनवर कॉल केला मात्र तेथील स्टॉफने मोहित रैना नावाचा पेशंट नसल्याचे सांगितले, मात्र मोहित रैनाने सेम रुग्णाल्याच्या डाॅक्टरचे प्रिस्क्रिप्शन शेअर केले होते.

ही मोहितची लेटेस्ट इन्स्टाग्राम पोस्ट आहे जी त्याने 18 मे रोजी केली आहे. यात तो कोणत्याही प्रकारच्या अडचणीत आहेत हे दिसत नाही.
ही मोहितची लेटेस्ट इन्स्टाग्राम पोस्ट आहे जी त्याने 18 मे रोजी केली आहे. यात तो कोणत्याही प्रकारच्या अडचणीत आहेत हे दिसत नाही.

मोहितने 23 एप्रिल 2021 ला स्वत: पॉझिटिव्ह आल्याची माहिती सोशल मीडियावर दिली होती. त्यानंतर त्याच्या सहकलाकारांनी त्याला संदेश टाकून विचारपूस केली होती.

बातम्या आणखी आहेत...