आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वेडिंग टेल्स:महिला पुजारी शीला अत्ता यांनी केल्या दीया-वैभवच्या लग्नाचे सर्व विधी, नेटक-यांनी दीयाचे कौतुक करताना म्हटले - 'तू ख-या अर्थाने स्त्रीवाद जगतेय'

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दीया आणि वैभव यांनी हिंदू पद्धतीने लग्न केले.

अभिनेत्री दीया मिर्झा सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. 15 फेब्रुवारी रोजी बिझनेसमन वैभव रेखीसोबत दीया विवाहबद्ध झाली. विशेष म्हणजे दीया आणि वैभव यांचे हे दुसरे लग्न आहे. दीयाने तिच्या सोशल मीडिया अकाउटंवर लग्नसोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत. तिने शेअर केलेल्या एका फोटोची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा होतेय. या चर्चेमागचे कारणदेखील तितकेच खास आहे. बऱ्याच वेळा लग्नात विधी करण्यासाठी पुरुष पुजारी असतो. पण दीयाच्या लग्नात मात्र महिला पुजारी सर्व विधी करताना दिसत आहे.

दीया आणि वैभव यांनी हिंदू पद्धतीने लग्न केले. महिला पुजारी शीला अत्ता यांनी त्यांच्या लग्नाचे सर्व विधी केले. दीयाच्या लग्नाचा हा फोटो पाहून नेटकऱ्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

एका यूजरने म्हटले, 'पहिल्यांदाच महिला पुजारीला लग्न लावताना पाहिलंय.' तर आणखी एका यूजरने दीयाची स्तुती करताना 'तू ख-या अर्थाने स्त्रीवाद जगतेय,' असे म्हटले आहे.

दीया आणि वैभव यांचे दुसरे लग्न
दीया आणि वैभव यांचे हे दुसरे लग्न आहे. दीयाचे पहिले लग्न बिझनेसमन साहिल संघासोबत झाले होते. ऑक्टोबर 2014 मध्ये दोघांनी दिल्लीत आर्य-समाजात अगदी साधा पद्धतीने लग्न केले होते. दीया आणि साहिल लग्नापूर्वी 6 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर त्यांनी लग्न केले होते. मात्र 2019 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला होता.

दीया प्रमाणेच वैभवचेही पहिले लग्न झाले होते. पहिल्या लग्नापासून त्याला एक मुलगी आहे. योगा आणि लाइफस्टाइल कोच सुनैना रेखीसोबत वैभवचे पहिले लग्न झाले होते. मात्र लग्नाच्या काही वर्षांतच दोघे विभक्त झाले. वैभव हा एक प्रसिद्ध व्यावसायिक असून मुंबईतील पाली हिल परिसरात राहतो.

'थप्पड' होता शेवटचा चित्रपट
दीयाचा तापसी पन्नू स्टारर 'थप्पड'मध्ये झळकली होती. या चित्रपटात तिने शिवानी नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती. चित्रपटाचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा होते. यापूर्वी दीयानेही 2019 मध्ये डिजिटल डेब्यू केला होता. 'काफिर' या वेब शोमध्ये तिने कनाझ अख्तरची भूमिका साकारली होती.

बातम्या आणखी आहेत...