आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'द कश्मीर फाइल्स'चे लेखक सौरभ पांडे यांच्याशी बातचीत:भर रस्त्यात महिलांवर बलात्कार झाले, चिमुकल्यांवर गोळ्या झाडल्या गेल्या; जे घडले त्यातील 5% चित्रपटात दाखवू शकलो!

उमेशकुमार उपाध्याय2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाचा सविस्तर मुलाखत...

11 मार्च रोजी रिलीज झालेला 'द कश्मीर फाइल्स' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सातत्याने मोठे रेकॉर्ड बनवत आहे. दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री आणि त्यांच्या टीमने कठोर परिश्रम आणि आणि अनेक तासांच्या सखोल संशोधनातून तथ्य समोर आणले आहेत. चित्रपटाचे लेखक आणि संशोधक सौरभ पांडे यांनी दिव्य मराठीसोबतच्या खास बातचीतमधअये चित्रपटाशी संबंधित काही खास माहिती सांगितली आहे...

लोकांच्या हृदयद्रावक कथा ऐकून असे वाटले की, माझ्यासमोरच त्या घटना घडत आहेत
दीड-दोन वर्षाच्या चिमुरडीची बंदुकीच्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. भर रस्त्यांवर महिलांवर बलात्कार करण्यात आले, त्यांना नदीत फेकून दिले गेले, अनेकांना घर सोडून जाण्यास भाग पाडले गेले. तिथल्या लोकांमध्ये दहशत पसरली होती आणि त्या दहशतीत भीतीने ते लोक कोणत्या अवस्थेत जम्मू कॅम्पमध्ये पोहोचले असतील, याचा अंदाज बांधता येतो. मात्र, त्यांच्यासाठी कोणीही काही केले नाही.

लोकांकडून हे सर्व ऐकून असे वाटले की, जणू माझ्या डोळ्यांसमोर हे घडत आहे. आता चित्रपट तयार आहे. तेव्हा असे वाटते की हे एक अतिशय लहान योगदान आहेते. कदाचित त्या गोष्टीचे ज्ञान होईल, लोकांना ती गोष्ट समजेल आणि असे काही पुन्हा घडणार नाही. असे पुन्हा कधीही घडू नये, हीच मी देवाला प्रार्थना करतो.

कथा लिहायला बसलो, मग स्वर्गाची प्रतिमा वाईट दिसू लागली
मी लहानपणी वाचले होते की, काश्मीर हे पृथ्वीवरचे स्वर्ग आहे. मग ही संपूर्ण संकल्पनाच चुकीची असल्याचे मला दिसले. हा स्वर्ग नरकापेक्षा घाणेरडा आहे. हत्याकांड घडत आहे, लोक मारले जात आहेत. कथा लिहायला बसलो तेव्हा काश्मीर या स्वर्गाबद्दल माझ्या मनात जी प्रतिमा होती, ती खराब झाली.एका वेगळ्याच भ्रमात जगतोय असं वाटलं. तिथला जो समाज सर्वात सुशिक्षित वर्ग होता, जो सर्वात शांत समाज होता, त्याचा अतोनात छळ झाला आणि त्यांना तेथून हाकलून लावण्यात आले आणि आपण गप्प बसलो. लोकांच्या मुलाखती घेत असताना त्यांच्या आणि मुलांच्या वेदना ऐकणे खूप कठीण होते.

चित्रपटात एक संवाद आहे - 'टूटे हुए लोग बोलते नहीं, उन्हें सुनना पड़ता है।' अशी त्यांची अवस्था होती. छावणीत राहणाऱ्या लोकांच्या अंगावर फोड आले होते. मुलांना रस्त्यावर झोपावे लागले. जेवण मिळत नव्हते. हे सगळं लिहिताना असं वाटत होतं की मी त्यांच्यासोबत आयुष्य जगत आहे. आतून आवाज यायचा की देवा कृपा करुन असे कुणासोबतही घडू देऊ नकोस.

सगळ्या गोष्टी बोलता येत नाहीत आणि दाखवताही येत नाहीत
चित्रपटाला कालमर्यादा असते. त्यातच सर्व काही दाखवायचे असते. मी जितके वाचले, जितके संशोधन केले, त्यानुसार आम्ही केवळ 5-10%च गोष्टी दाखवल्या आहेत. 5% म्हणायचा अर्थ म्हणजे फक्त 4-5 लोकांच्या कथा दाखवू शकतो, तिथे तर पीडित लाखो लोक आहेत.

संशोधन आणि स्क्रिप्टिंगमध्ये साडेतीन वर्षे घालवली
सौरभ म्हणाले, या चित्रपटाची कल्पना विवेक अग्निहोत्रींची होती. मी विवेक सरांसोबत ताश्कंद फाइल्समध्येही काम केले आहे. त्यांच्याकडे संशोधक आणि स्क्रिप्ट सुपरवाइजर होते. त्यांना माझे काम आवडले, मग त्यांनी काश्मीर फाइल्सवर काम करण्यास सांगितले. आम्ही संशोधन करायला सुरुवात केली तेव्हा जवळपास दोन वर्षे संशोधन चालले.

याकाळात आम्ही 700 मुलाखती घेतल्या. जमेल तेवढी पुस्तके वाचली. साधारण 15 ते 20 पुस्तके वाचली असतील. बातम्या आणि लेख शोधून माहिती गोळा केली. काश्मिरी लोकांचे काय झाले ते शोधले. यानंतर स्क्रिप्टिंगच्या प्रक्रियेला सुरुवात केली. संशोधन आणि स्क्रिप्ट लिहिण्यासाठी आम्हाला साडेतीन वर्षे लागली. मग आम्ही शूटिंगसाठी तयार झालो.

संशोधनासाठी एक पुस्तक पुन्हा वाचावे लागले
संशोधनाचा एक पॅटर्न असतो, जी आपली रचना आहे, आधी आपण पुस्तक वाचतो. मग त्या पुस्तकाचा सारांश तयार केला जातो. प्रत्येक पुस्तकासाठी एक पॉइंटर बनतो. पॉइंटर नंतर, तथ्य तपासले जाते की ते किती बरोबर आहे. काय वापरावे आणि काय करू नये. त्यानंतर एक योग्य बायबल बनवले जाते, ज्यामध्ये पॉइंट टू पॉइंट लिहिले जाते. जेव्हा जेव्हा त्या मुद्द्याबद्दल अधिक जाणून घ्यायचे असते तेव्हा ते पुन्हा पुन्हा वाचावे लागते. मूलभूत संशोधनानंतर कथेची रचना उभी राहते. त्यानंतर स्क्रीन प्ले तयार केला जातो. या सगळ्यासाठी दीड वर्ष लागले, अनेक आराखडे तयार झाले. यात कथाच हीरो होती.

दिल्ली, मुंबईहून कॅनडा, अमेरिका आणि जर्मनीला मुलाखतीसाठी गेले
ज्यांच्यावर अत्याचार झाला त्यांच्याशी, त्यांच्या कुटुंबियांशी आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांशी बोलण्यासाठी बोलण्यासाठी दिल्ली, मुंबई, जम्मू, कॅनडा, यूएसएस, जर्मनीसह जगभरात जिथे जिथे काश्मिर लोक गेले आहेत, तिथे आमची टीम गेली. आणि त्यांच्या मुलाखत घेतल्या. त्यांच्यासोबत काय झाले होते ते सविस्तर जाणून घेतले.

सगळ्यात आव्हानात्मक गोष्ट म्हणजे मी लेखक म्हणून सामील झालो, तेव्हा मला ती गोष्ट जाणवू लागली, मग ती सततची वेदना झाली. हळुहळू हा चित्रपट माझ्यासाठी चित्रपट नव्हे तर वास्तव बनला. मी त्याच्याशी मनापासून जोडला गेलो होतो, मग कुठेतरी मला खूप वाईट वाटले की जे काही झाले, ते होऊ नये. तसे झाले नसते तर मला हे सर्व वाचावे लागले नसते.

संशोधनासाठी दोन टीम तयार करण्यात आल्या, 99% व्हिडिओ मुलाखती घेतल्या
संशोधनासाठी आमच्याकडे दोन टीम होत्या. एका टीमसोबत मी आणि दुस-या टीमसोबत विवेक सरांनी काम केले. एका टीममध्ये चार-पाच जण होते. एक कॅमेरा पर्सन, एक असिस्टंट, एक प्रश्न विचारणारा, एक साउंड रेकॉर्डर आणि एक रिसर्चर होता.

मी माझ्या टीमसोबत मुंबई, दिल्ली, जम्मू इत्यादी ठिकाणी संशोधनासाठी गेलो, तर विवेक सरांच्या टीमने परदेशात जाऊन कव्हर केले. 99% व्हिडिओ मुलाखती घेण्यात आल्या आणि जिथे व्हिडिओ शक्य नाही असे वाटले तेथे ऑडिओ मुलाखती घेण्यात आल्या.

काश्मिरी हिंदूशिवाय काश्मीर अपूर्ण आहे
आज समाजाचा समतोल बिघडत चालला आहे. माणूस म्हणून विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता तुमच्यात असेल तर त्याचा वापर करा. मी म्हणेन की तुम्हाला शिकायचे असेल तर काश्मिरी हिंदूंकडून शिकले पाहिजे. त्यांच्यासोबत एवढे चुकीचे घडले पण कधी त्यांनी बंदूक उचलली नाही. यासाठी सर्व समाजाचा आदर राखला पाहिजे. काश्मिरी हिंदूशिवाय काश्मीर अपूर्ण आहे.

डोळ्यांसमोर तेच चित्र उभ राहायचे, असे का झाले?
चित्रपटात नाडरमरचा एक हृद्यद्रावाक प्रसंग आहे. तो वाचून मला धक्काच बसला होता. आम्ही नाडरमर येथे मुलाखत घ्यायला गेलो तेव्हा आम्हाला एका कुटुंबातील बचावलेली एकमेव व्यक्ती भेटली. ती व्यक्ती लहान असताना हे सगळे घडले होते. झाले असे की त्यांचे आजोबा जम्मूला जाणार होते, पण आजोबांच्या जागी ते निघून गेले, त्यामुळे नरसंहारातून ते बचावले होते. आज जरी त्यांच्याकडे बघितले तर ते अजूनही त्या धक्क्यातून स्वतःला सावरु शकलेले नाहीत. ती व्यथा आणि वेदना त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट दिसत होती. माझ्या डोळ्यासमोर एक पीडित व्यक्ती बसली होती. त्याच्या कुटुंबासह आजूबाजुच्या 20-21 लोकांना एकत्र उभे करुन ठार मारण्यात आले होते. डोळ्यासमोर एकच चित्र येत होते, असे का झाले? झालं तर कोणाला का कळले नाही? मग वाटले आपण हेच सत्य सांगण्याचा प्रयत्न करत आहोत.

मी माणुसकी मरु देणार नाही
प्रत्येक कथा मनावर काही ना काही प्रभाव टाकते. या चित्रपटाचा माझ्यावर असा परिणाम झाला की, मी माझ्यातील माणुसकी कधीही मरू देणार नाही. मला आशा आहे की अशा गोष्टी पुन्हा घडणार नाहीत. असे कुठेही घडले, तर माझ्या क्षमतेनुसार जे शक्य असेल ते मी करेन. एक म्हणजे गाजावाजा करणे, आणि दुसरे योगदान देणे. माझ्याकडून होईल तेवढे योगदान मी देईन. मला दररोज एक चांगली व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपण एकमेकांचा कायम आदर करायला हवा.

बातम्या आणखी आहेत...