आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

खुलासा:स्क्रिप्ट रायटर अपूर्वने प्रियकर सिद्धांतबरोबर खरेदी केले घर,  भावंडं असल्याचे सांगत 13 वर्षे लपवले होते नाते

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आम्ही भावंडं नसून एकमेकांचे पार्टनर्स आहोत, असे त्यांनी जगजाहीर केले आहे.
Advertisement
Advertisement

स्क्रिप्ट रायटर आणि नॅशनल अवॉर्ड विनर अपूर्व असरानीने त्याचा प्रियकर सिद्धांतसोबत मिळून मुंबईत स्वतःचे घर खरेदी केले आहे. शुक्रवारी 42 वर्षीय अपूर्वने ट्विटरवरुन ही माहिती दिली. अपूर्व आणि सिद्धांत गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. विशेष म्हणजे एवढी वर्षे हे दोघे भावंडं म्हणून समाजात वावरत होते, पण आता आम्ही भावंडं नसून एकमेकांचे पार्टनर्स आहोत, असे त्यांनी जगजाहीर केले आहे.

  • सोबत राहण्यासाठी एकमेकांचे भावंड असल्याचे सांगत होते

अपूर्वने दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत अपूर्व सिद्धांतसोबत दिसतोय. तर दुस-या फोटोत त्यांच्या नवीन घराच्या दारावर दोघांची नेमप्लेट दिसतेय. “गेल्या 13 वर्षांपासून आम्ही एकत्र राहत आहोत. मात्र कायम आम्हाला भावंड असल्यासारखं वावरावे लागत होते. घर भाड्याने मिळावे यासाठी आम्हाला भाऊ असल्याचे नाटक करावे लागत होते. तसंच शेजारील लोकांना आमच्या नात्याविषयी कळू नये त्यामुळे कायम आम्हाला घराचे पडदे लावून ठेवायला सांगत असायचे. मात्र काही काळापूर्वीच आम्ही दोघांनी स्वत:चे घर घेतले आहे. त्यामुळे आता आम्ही स्वत:हून लोकांना आमच्या नात्याविषयी सांगतो. आम्ही एकमेकांचे पार्टनर आहोत हे बिनधास्त सांगतोय. हिच ती वेळ आहे जेव्हा LGBTQ मधील नागरिकांना समाजात वावरण्याचा दर्जा मिळेल”, असे ट्विट अपूर्वने केले आहे.

  • 'स्नाइप'साठी मिळाला होता राष्ट्रीय पुरस्कार

अपूर्व दिग्दर्शक, निर्माता आहे. अपूर्वाने 'सत्य' (1998), 'स्निप' (2000), 'शाहिद' (2012) आणि 'अलिगड' (2015) सारख्या चित्रपटांची एडिटिंग केली आहे. मनोज बाजपेयी स्टारर 'अलिगढ' या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवादही त्याचेच होते. 'स्नाइप'साठी सर्वोत्कृष्ट संपादनाचा राष्ट्रीय पुरस्कार त्याला मिळाला होता.

Advertisement
0