आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

वाद :हिंदुस्तानी भाऊने एकता कपूरला पाठवली कायदेशीर नोटीस, म्हणाला- वेब शोमध्ये भारतीय सैन्याचा अवमान केल्याबद्दल माफी मागावी 

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या संपूर्ण वादावर एकता किंवा प्रॉडक्शन हाऊसकडून कोणताही प्रतिक्रिया मिळालेली नाही.

निर्माती एकता कपूरविरोधात मुंबई पोलिसात तक्रार नोंदवल्यानंतर हिंदुस्तानी भाऊ या नावाने प्रसिद्ध असलेल्या विकास पाठकने आता तिला कायदेशीर नोटीस पाठविली आहे. एकताने तिचा वेब शो 'XXX अनसेन्सर्ड 2'मध्ये भारतीय सैन्याचा अवमान केल्याबद्दल माफी मागावी आणि 100 कोटी रुपये भारत सरकारला द्यावे अशी मागणी त्याने केली आहे.

वकीलाने दिला बातमीला दुजोरा

एकता कपूरला नोटीस पाठवल्याच्या बातमीला हिंदुस्तानी भाऊचे वकील अली कासिफ खान यांनी दुजोरा दिला आहे. स्पॉटबॉयशी बोलताना ते म्हणाले, होय, आम्ही एकता कपूर यांना कायदेशीर नोटीस पाठविली आहे. एकता यांनी भारतीय सैन्यदलाकडे माफी मागावी आणि भरपाई म्हणून 100 कोटी रुपये भारत सरकारच्या खात्यात जमा करावे, अशी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. 

अली यांनी पुढे सांगितले की, आम्ही त्यात एक अट टाकली आहे, त्यानुसार 14 दिवसांत जर त्यांनी नोटिसचे पालन केले नाही तर ते पोलिसांत तक्रार दाखल करतील तसेच अल्ट बालाजीवर बंदी आणण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात येईल. 

काय प्रकरण आहे?

एकता कपूरचे प्रॉडक्शन हाऊस अल्ट बालाजीची वेब सीरिज  'XXX अनसेन्सर्ड 2' यामध्ये अभिनेत्री अदिती कोहलीने एका आर्मी ऑफिसरच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. पती ड्युटी गेल्यावर ती रिबू मेहरा नावाच्या तरुणाला घरी बोलावते आणि त्याला आर्मीचा गणवेश परिधान करायला देऊन त्याच्यासोबत इंटीमेट होते.   

हिंदुस्तानी भाऊने हे दृश्य आक्षेपार्ह असून भारतीय सैन्याचा अवमान असल्याचे म्हटले आहे. एकता कपूर, तिची आई शोभा कपूर आणि अल्ट बालाजी यांच्याविरोधात त्याने मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या संपूर्ण वादावर एकता किंवा प्रॉडक्शन हाऊसकडून कोणताही प्रतिक्रिया मिळालेली नाही.

कोण आहे हिंदुस्तानी भाऊ?

विकास जयनारायण पाठक असे हिंदुस्तानी भाऊचे खरे नाव आहे. तो यूट्यूबर आणि टिक टॉक स्टार्स देखील आहेत. 'बिग बॉस' च्या 13 व्या सीझनमध्ये त्याने स्पर्धक म्हणून वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती. 

0