आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Yami Gautam Bridal Attire Included Her Mother's 33 Year Old Saree यामी के वेडिंग सीक्रेट्स:यामी

यामीचे वेडिंग सीक्रेट्स:यामीने लग्नात आई अंजलीची 33 वर्षे जुनी सिल्क साडी केली होती परिधान, आजीने दिलेल्या ओढणीने पूर्ण केला लूक

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • यामीने स्वतः केला मेकअप

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री यामी गौतम आणि दिग्दर्शक आदित्य धर यांनी 4 जून रोजी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न थाटले. यामीच्या वेडिंग लूकची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. आता तिच्या या लूकमागील काही खास गोष्टी समोर आल्या आहेत. यामीने तिच्या लग्नात आई अंजलीची 33 वर्षे जुनी पारंपरिक रेशमी साडी परिधान केली होती. इतकेच नाही तर आपला हा लूक पूर्ण करण्यासाठी यामीने तिच्या आजीने तिला दिलेली लाल रंगाची ओढणी कॅरी केली होती.

यामीने स्वतः केला मेकअप
यामीने लग्नात स्वतःच मेकअप केला होता. तिने घातलेल्या नथीनेसुद्धा लक्ष वेधून घेतले. ही नथदेखील यामीला तिच्या आजीने भेट म्हणून दिली होती. तर हेअर स्टाइल यामीची बहीण सुरीली गौतमने केली होती. यामीने आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना तिच्या लग्नातील एक खास फोटो शेअर केला आहे.

यामीच्या लग्नाची ही आहेत वैशिष्ट्ये
यामी आणि आदित्य धर यांनी सीक्रेट वेडिंग केले. 4 जून रोजी लग्नातील एक फोटो शेअर दोघांनी लग्नाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. यामीच्या लग्नाची तयारी अगदी कमी कालावधीत पूर्ण झाली. यामीच्या वडिलांनी लग्नाची तयारी संगीत आणि मेहंदी कार्यक्रमाच्या आदल्या दिवशीच सुरु केली होती. गौतम परिवाराने बिलासपूर आणि हमीरपुर येथून लग्न विधी पूर्ण करण्यासाठी पंडितांना बोलावले होते. देवदराच्या झाडासमोर यामी-आदित्यचे लग्न झाले. लग्नाचा मंडप झेंडूची फुले व केळीच्या पानांनी सजवण्यात आला होता. संपूर्ण सजावट पांढ-या रंगाची होती. यामीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे म्हणजे, भूत पोलिस, ए थर्सडे आणि दसवी हे तिचे आगामी प्रोजेक्ट आहेत.

बातम्या आणखी आहेत...