आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादाच्या भोव-यात यामी गौतम:अभिनेत्रीला EDचे समन्स,  FEMA कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी 7 जुलै रोजी होणार चौकशी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या प्रकरणी यामीला विरोधात दुस-यांदा समन्स जारी करण्यात आले आहे.

अलीकडेच लग्नाच्या बेडीत अडकलेली प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम वादाच्या भोव-यात सापडली आहे. तिला अंलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने समन्स बजावले आहे. ईडीने फेमा अर्थात परकीय चलन व्यवस्थापन अधिनियम कायद्याअंतर्गत हे समन्स बजावले आहे. फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याचा तिच्यावर आरोप आहे. यासंदर्भात तिची चौकशी केली जाणार आहे. 7 जुलै रोजी तिला चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर राहावे लागणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यमीच्या वैयक्तिक बँक खात्यात दीड कोटी रुपयांचे परकीय चलन व्यवहार करण्यात आले असून तिने यासंदर्भात संबंधित अधिका-यांना माहिती दिली नाही. यातील काही व्यवहारांवर शंका उपस्थित करत ईडीने हे समन्स तिला बजावले केले आहे.

ईडीने दुस-यांदा पाठवले समन्स

या प्रकरणी यामीला दुस-यांदा समन्स जारी करण्यात आले आहे. यावेळी जर ती चौकशीसाठी हजर राहिली नाही तर तिला अटकही केली जाऊ शकते. फेमा अर्थात परकीय चलनासंबंधित कायदा आहे. यानुसार, परदेशातून काही वस्तू-सेवांबाबत केलेल्या व्यवहारांची नोंद ठेवली जाते. यामध्ये काही गडबड किंवा शंका आढळल्यास कारवाई केली जाते. फेमा कायद्यानुसार व्यवहार झालेली देशी किंवा परदेशी मालमत्ता जप्त करता येते.

4 जून रोजी यामीने दिग्दर्शकासोबत थाटले लग्न
यामीचे काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक आदित्य धरसोबत लग्न झाले आहे. तीन दिवसांपूर्वीच हनीमूनहून परतल्यानंतर तिने 'ए थर्सडे' या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. यामी या चित्रपटात नैना जायस्वाल नावाच्या शिक्षिकेची भूमिका साकारताना दिसणार आहे.

आदित्य धर दिग्दर्शित ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटात यामीने काम केले होते. ‘उरी’ हा आदित्यचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट होता. आदित्यने याआधी ‘काबूल एक्स्प्रेस’, ‘तेज’, ‘आक्रोश’सारख्या चित्रपटांसाठी गीतकार, पटकथाकार अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. तर यामी 'फेअर अँड लव्हली' या जाहिरातीतून प्रसिद्धीझोतात आली. तिने 'उरी'सह 'काबिल', 'सनम रे', 'गिन्नी वेड्स सनी', 'विक्की डोनर', 'बाला', 'बदलापुर', 'टोटल सियापा' या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.

बातम्या आणखी आहेत...