आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रिलीज डेट जाहीर:चाहत्यांची प्रतीक्षा संपली, 16 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय यश स्टारर 'KGF चॅप्टर 2'

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • यावर्षी 16 जुलै रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे.

अभिनेता यशची प्रमुख भूमिका असलेल्या 'KGF चॅप्टर 2' या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. शुक्रवारी एक पोस्टर रिलीज करत निर्मात्यांनी चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. यावर्षी 16 जुलै रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे.

या चित्रपटात सुपरस्टार यशसोबत बॉलिवूड अभिनेता संजय दत्त, अभिनेत्री रवीना टंडन, अभिनेत्री श्रीनिधी शेट्टी, प्रकाश राज यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले असून, चित्रपटाचे चाहते बर्‍याच दिवसांपासून याची वाट पाहत आहेत.

चित्रपटात बॉलिवूड अभिनेता संजय खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे, तर रवीना टंडन रामिका सेन नावाच्या नेत्याच्या भूमिकेत दिसणार आहे. केजीएफ चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु कोरोनामुळे चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. आता हा चित्रपट 16 जुलै 2021 रोजी प्रदर्शित होईल.

सुरूवातीला चित्रपटाच्या भारतात 2000 प्रिंट्स जाहीर केला होत्या, आता त्या दुप्पट करण्यात येणार आहेत. कन्नड, हिंदी, तेलगू, तामिळ आणि मल्याळम भाषेतच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...