आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यशराज त्यांच्या नावात जोडायचे राजेश खन्नांचे नाव:पहिल्या चित्रपटाला वितरक मिळाला नाही म्हणून राजेश खन्ना यांनी केली होती मदत

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजेश खन्ना यांना सुपरस्टार, शाहरुखला रोमान्सचा बादशाह आणि अमिताभ बच्चन यांना महानायक बनवण्यामागील नाव म्हणजे यश चोप्रा. 53 वर्षांच्या आपल्या फिल्मी करिअरमध्ये त्यांनी अनेक बदलते जॉनर, अनेक मोठे कलाकार बनताना आणि अनेकांना उद्धवस्त होताना पाहिले. त्यांनी कधी 'लम्हे' मधून जगाला सुंदर कथा दाखवली तर तर कधी 'प्रेम' करायला शिकवले.

हिंदी चित्रपटसृष्टीला जगभरात ओळख मिळवून देणारे यश चोप्रा हे बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांपैकी एक होते. आयुष्यात ज्या थ्रिल, प्रेम आणि अॅक्शनची लोक फक्त कल्पना करू शकत होते, ते त्यांनी पडद्यावर दाखवले आणि लोकांचे मनोरंजन केले. त्यांनी दीवार, लम्हे, डरसारखे कल्ट क्लासिक चित्रपट केले, तर राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, श्रीदेवी, शाहरुख खान यांना स्टार बनवण्याचे श्रेयही त्यांना जाते. दादासाहेब फाळके, पद्मभूषण, 7 राष्ट्रीय पुरस्कार, 12 फिल्मफेअरसह अनेक मोठे पुरस्कार त्यांच्या नावी आहेत. 1959 च्या धूल का फूल या चित्रपटापासून सुरू झालेला त्यांचा दिग्दर्शनाचा प्रवास 2012 मध्ये आलेल्या जब तक है जान या चित्रपटाने संपला.

जेवढ्या रंजक चित्रपटांच्या कथा, तेवढेच रंजक त्यांच्या जीवनाचे किस्से आहे...

8 भावंडांमध्ये सर्वात लहान असलेल्या यश यांना लहानपणापासूनच चित्रपटांची आवड होती. फाळणीनंतर जेव्हा त्यांचे कुटुंब लाहोरहून लुधियानाला आले तेव्हा यशही मोठ्या भावासोबत मुंबईला पोहोचले. मोठे भाऊ बीआर चोप्रा हिंदी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक होते, त्यामुळे धाकटे यश त्यांना मदत करु लागले. त्यांना पहिल्यांदा 1959 मध्ये आलेल्या 'धूल का फूल' या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली. 1961 चा धर्मपुत्र हा त्यांचा दुसरा चित्रपट होता. यश चोप्रांचे काम लोकांना आवडू लागले आणि मोठ्या निर्मात्यांचे चित्रपट त्यांच्या खात्यात येऊ लागले.

यश चोप्रा हे बॉलिवूडमधील सर्वात प्रयोगशील दिग्दर्शक होते

चित्रपटात शिफॉनच्या साड्या आणि सरसोच्या शेतात नायिका सादर करण्याचा ट्रेंड त्यांनीच सुरू केला. हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिला मल्टीस्टारर चित्रपट वक्त देखील त्यांच्या दिग्दर्शनाखाली बनला. ज्या काळात चित्रपट गाण्यांनी हिट व्हायचे, त्याकाळात यश चोप्रांनी राजेश खन्ना आणि नंदा यांना घेऊन इत्तेफाक हा चित्रपट बनवला, ज्यामध्ये कोणतेही गाणे किंवा मध्यांतर नव्हते. यश यांना दोन्ही चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.

यश चोप्रा ज्यांनी अमिताभ बच्चन यांना महानायक बनवले

यश चोप्रांनी 1970 मध्ये आपला भाऊ बीआर चोप्रांना सोडून स्वतःचे प्रोडक्शन हाऊस यशराज फिल्म्स सुरू केले. त्यांची निर्मिती असलेला पहिला चित्रपट दाग होता, ज्यासाठी यश यांना तिसरा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला, तर पुढचा चित्रपट 'दीवार' होता. तोच हा चित्रपट ज्याचा मेरे पास माँ है हा संवाद आजही लोकांच्या ओठी आहे. दीवारनंतर यश चोप्रांनी अमिताभसोबत त्रिशूल, कभी-कभी, सिलसिला असे चित्रपट केले, ज्यामुळे अमिताभ स्टार झाले. यश चोप्रांसाठीचे बहुतेक चित्रपट सलीम-जावेद या लेखक जोडीने लिहिले होते. त्यांच्या सांगण्यावरून जावेद अख्तर यांनी गाणी लिहायला सुरुवात केली होती.

काही फ्लॉप चित्रपटही खात्यात होते

नाखुदा, सवाल, फांसले, मशाल आणि विजय यांसारख्या अनेक फ्लॉप चित्रपटांमुळे यश चोप्रांना त्यांच्या करिअरमध्ये अपयशाला सामोरे जावे लागले.

यश चोप्रांच्या चित्रपटाचे मजेशीर किस्से

डर

यश चोप्रांना या चित्रपटात खलनायक म्हणून शाहरुख खानऐवजी अजय देवगणला राहुलच्या भूमिकेत कास्ट करायचे होते. अजयच्या तारखा न मिळाल्याने यश चोप्रा यांनी ही भूमिका आमिर खानला ऑफर केली होती, पण आमिरने या भूमिकेत रस दाखवला नाही. नंतर ही भूमिका शाहरुखकडे गेली. या चित्रपटातून शाहरुखला खूप प्रसिद्धी मिळाली, तर यश यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. यश आणि शाहरुखची जोडगोळी बनली. या जोडीने दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, दिल तो पागल है, वीर-जारा, रब ने बना दी जोडी या चित्रपटात एकत्र काम केले. यश चोप्रांचा शेवटचा चित्रपट 'जब तक है जान'मध्येही शाहरुख नायक होता. यश यांन डरमध्ये जुहीच्या आधी श्रीदेवीला कास्ट करायचे होते, पण श्रीदेवीने भूमिका करण्यास नकार दिला होता.

साथिया​​​​​​​

साथिया या चित्रपटात राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत होती, पण तिला ही भूमिका करायची नव्हती. राणी मुखर्जीचे मन वळवण्यासाठी यश चोप्राने तिच्या आई-वडिलांना एका खोलीत बंद केले होते. राणी हो म्हणेपर्यंत दार उघडणार नाही असे यश यांनी सांगितले होते. शेवटी राणीला हो म्हणावे लागले होते.

डाग

निर्माता म्हणून यश चोप्रांचा हा पहिलाच चित्रपट होता. कोणताही वितरक हा चित्रपट खरेदी करण्यास तयार नव्हता. अशा परिस्थितीत राजेश खन्ना यांनी यश यांना जोपर्यंत चित्रपटाचा खर्च निघत नाही, तोपर्यंत मानधन घेणार नाही असे सांगून दिलासा दिला. राखी आणि साहिर लुधियानवी यांनीही तसेच केले. हा चित्रपट फ्लॉप ठरेल, त्यामुळे जास्त प्रमोशन करणे मूर्खपणाचे ठरेल, असे अनेकांनी यश यांना म्हटले होते. हा चित्रपट केवळ 9 चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. दुसऱ्या दिवसापासूनच या चित्रपटाला अनेक स्क्रीन्स मिळू लागल्या आणि चित्रपट हिट झाला. यश चोप्रा कायम राजेश खन्ना यांचे आभार मानत होते, कारण त्यांच्या मदतीने दाग हा चित्रपट बनला आणि हिट झाला. असे म्हणतात की, यश चोप्रा राजेश खन्ना यांच्या नावातील राज आपल्या नावासोबत जोडत असत.

सिलसिला​​​​​​​​​​​​​​

यश चोप्रांना सुरु​​​​​​​वातीपासूनच जया बच्चन आणि रेखा यांना चित्रपटात कास्ट करायचे होते, पण त्यामुळे अमिताभ यांना त्रास होईल अशी भीती त्यांना वाटत होती. मनाविरुद्ध यश यांनी या चित्रपटात परवीन बाबी आणि स्मिता पाटील यांना कास्ट केले. हे सांगण्यासाठी जेव्हा ते अमिताभ यांच्याकडे पोहोचले तेव्हा त्यांनी विचारले की ही तुमची आयडियल कास्टिंग आहे का? याचवेळी यश यांनी अमिताभ यांना सांगितले की, मला या चित्रपटात जया आणि रेखाला कास्ट करायचे आहे. अमिताभ गप्प बसले. काही वेळाने अमिताभ यश यांना म्हणाले की, मला यात काही अडचण नाही, पण तुम्हाला दोघींचा होकार मिळवावा लागेल. यश यांनी रेखा आणि जया यांना या चित्रपटासाठी राजी केले होते.

बातम्या आणखी आहेत...