आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आगामी:यशराज फिल्म्सने लॉकडाऊनमध्ये विकी कौशलला केले 'लॉक', लवकरच त्याला घेऊन बनवणार सिच्युएशनल कॉमेडी सिनेमा 

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सूत्रांनी सांगितल्यानुसार हा चित्रपट एक सिच्युएशनल कॉमेडी असेल.

या आठवड्याची सुरुवात मोठ्या प्रॉडक्शन हाऊसच्या घोषणांसह झाली आहे. रविवारी दक्षिणेच्या पन्नास वर्षे जुन्या एका चित्रपट निर्मिती कंपनीने दीपिका पदुकोण आणि प्रभास यांच्यासह नवीन चित्रपटाची घोषणा केली.  तर यशराज फिल्म्सने विकी कौशलसोबत एक मोठा चित्रपट साईन केला असल्याचे सोमवारी समोर आले आहे. विकी कौशलच्या निकटवर्तीयांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 

सूत्रांनी सांगितल्यानुसार हा चित्रपट एक सिच्युएशनल कॉमेडी असेल. मात्र 'डबल धमाल' आणि 'गोलमाल'सारखा नसेल. तर हृषिकेश मुखर्जी यांच्या चित्रपटांसारखा तो असेल. लॉकडाऊन दरम्यान विकी कौशलसोबत या चित्रपटाविषयी बोलणी पूर्ण झाली आहे. 

  • विकीच्या करिअरमधील पहिला विनोदी चित्रपट असेल

विकी कौशलच्या करिअरमधील हा पहिला विनोदी चित्रपट असेल. प्रॉडक्शन हाऊसला त्याच्यातील कॉमिक टायमिंगचे कौशल्य दिसले त्यामुळे त्यांनी त्याला साइन केले आहे. चित्रपटाची स्क्रिप्ट यशराज स्टुडिओच्या मालकीची आहे.  

  • येत्या एक-दोन महिन्यांत या चित्रपटाची घोषणा होईल

सध्याच्या परिस्थितीत चित्रपटाची घोषणा केली जाणार नाही. ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये याची अधिकृत घोषणा होईल, असे सूत्रांनी सांगितले. ट्रेड पंडितांनी सांगितले की, 'यशराजचा 'शमशेर' हा देखील एक चित्रपट आहे जो अॅक्शन धाटणीचा आहे.  तसेच 'पृथ्वीराज चौहान' हा ऐतिहासिक वॉर ड्रामादेखील आहे. म्हणूनच सिनेरसिकांना आता ते कॉमेडी चित्रपटाची मेजवानी देणार आहेत.'

  • दिग्दर्शकाचे नाव निश्चित झालेले नाही

विकीची ओळख 'उरी' चित्रपटातून अ‍ॅक्शन हिरो म्हणून झाली होती, पण त्याला स्टिरिओटाइप व्हायचे नाही. आता तो विनोदी चित्रपटात हात आजमावणआर आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे नाव अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलेले आहे. तसं पाहता शरत कटारिया, विजय कृष्णा आचार्य आणि सिद्धार्थ आनंद हे प्रॉडक्शन हाऊसमधील नावाजलेले दिग्दर्शक आहेत. विजय यांनी आत्तापर्यंत अ‍ॅक्शन चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. अशा परिस्थितीत दम लगा के हईशा आणि सुई धागा सारखे सिच्युएशनल कॉमेडी चित्रपट देणा-या शरत कटारिया यांचे नाव फायनल केले जाऊ शकते.  

  • विकीचे वडील करायचे यशराजच्या चित्रपटांसाठी स्टंट डिझाइन 

विकी कौशलचे वडील श्याम कौशल हेदेखील चित्रपटसृष्टीचा एक भाग आहेत. यशराज फिल्म्सच्या चित्रपटांसाठी ते स्टंट डिझाइन करीत असे. त्यांनी यशराज फिल्म्सचे चित्रपट जब तक है जान, मेरे ब्रदर की दुल्हन, गुंडे, काबुल एक्सप्रेस, न्यूयॉर्क, इशकजादे, औरंगजेब, धूम -3 आणि किल-दिल अशा चित्रपटांसाठी काम केले आहे.