आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भास्कर इंटरव्ह्यू:'रसोडें में कौन था' फेम यशराज मुखाते म्हणाला - एका सोशल मीडिया पेजवरुन सुचली संवादावर संगीत बनवण्याची कल्पना

ज्योति शर्मा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एका सोशल मीडिया पेजवरुन सुचली कल्पना

'रसोडें में कौन था' फेम यशराज मुखाते हा असा एक यूट्यूबर आहे जो आपल्या वेगळ्या प्रकारच्या संगीत शैलीमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतो. विशेषत: त्याचे संवादाला गाण्याच्या रुपात सादर करणे म्हणजेच त्याची पॅरोडी बनवणे प्रेक्षकांना आवडते. दिव्य मराठीसोबतच्या खास संभाषणात यशराजने त्याच्या या प्रतिभेबद्दल मनमोकळेपणाने सांगितले. काय सांगतोय यशराज...

एका सोशल मीडिया पेजवरुन सुचली कल्पना
यशराज सांगतो, मागील दोन वर्षांपासून मी संवादावर गाणी तयार करतोय. सर्वात पहिला व्हिडिओ मी नित्यानंद बाबाचा बनवला होता. मी डब शर्मा नावाच्या एका कलाकाराच्या सोशल मीडिया पेजवर ही गोष्ट पाहिली होती. त्याचे व्हिडिओ विनोदी स्वरुपाचे नव्हते, तर ते व्हिडिओ गंभीर स्वरुपाचे मात्र मजेशीर होते. या पेजवर एका संवादासह एक गाणे देखील तयार केले होते, जे मला खूप आवडले. विशेषत: मला ही कल्पना खूप आवडली. त्यानंतर, मी त्यांच्याच या कल्पनेवर म्युझिक व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. जे लोकांना आवडू लागले.

वडिलांकडून शिकलो कीबोर्ड वाजवणे
मी बालपणापासून संगीताच्या वातावरणात वाढलोय. कारण माझे वडील संगीताशी जुळले आहेत. ते गातात, कीबोर्ड वाजवतात. मी त्यांच्याकडूनच कीबोर्ड वाजवणे शिकलो. म्हणूनच लहानपणापासूनच संगीत माझ्याबरोबर राहिले. आई म्हणाली पहिले अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण कर, मग तुला जे करायचे आहे ते कर. तीन वर्षांपूर्वी माझे अभियांत्रिकी पूर्ण झाले. तेव्हापासून मी व्यावसायिकरित्या संगीत करत आहे. शिकत असतानाही मी संगीत सोडले नव्हते. शाळेतून घरी परतलो की मी कीबोर्ड वाजवायचो. झोपण्यापूर्वी एक ते दोन तास मी संगीतासाठी द्यायचो. आता शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पूर्ण वेळ मी संगीतात रमतोय.

शोच्या ऑडिशनमध्ये झालो होतो रिजेक्ट

मी एका रिअ‍ॅलिटी शोच्या ऑडिशनला गेलो होतो जिथे मला पहिल्या फेरीत अगदी पहिली ओळ गायण्यापूर्वीच काढून टाकण्यात आले होते. मी घरी परतलो. पॅरोडी मी पुर्वीपासूनच बनवायचो. याशिवाय मी माझी मूळ गाणीही रिलीज केली आहेत. लोकांना माझ्या पॅरोडीचे स्वरूप खूप आवडले. कारण त्यांना काहीतरी नवीन पाहायला मिळत होते. या व्यतिरिक्त, 30-40 सेकंदांचा लहान कंटेंट आहे. म्हणून लोक ते पाहिल्यानंतर पटकन स्क्रोल करण्यास सुरवात करतात. जेव्हा मला या व्हिडिओंवर अधिक रिच मिळाला, तेव्हा मी जे जास्त प्रमाणात तयार करत गेलो.

अद्याप चित्रपटात काम नाही

चित्रपटांसाठी चर्चा सुरु आहे. कधीकधी आठवड्यातून एक किंवा दोन कॉल येतात. कधी कुणी मीटिंगसाठी बोलवतो तर कधी कुणी माझी शिफारस दिग्दर्शकाकडे करतो. पण अद्यापपर्यंत मला चित्रपटाचे पूर्ण काम मिळालेले नाही. होय, पण ब्रँडचं काम सातत्याने येत आहे. सीरिजचेही काम मिळत आहे. याआधी एका मराठी मालिकेसाठी मी बॅकग्राउंड स्कोर दिला होता. पण आता मोठे प्रॉडक्शन हाऊसदेखील ऑफर देत आहेत.

बातम्या आणखी आहेत...