आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फॅन मोमेंट:टायगर श्रॉफचा स्टंट कॉपी करताना लहानगा चाहता जखमी, व्हिडिओ कॉलिंगद्वारे टायगरने साधला मुलाशी संवाद

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • टायगरचा एक आठ वर्षांचा चाहता त्याच्या स्टंटची कॉपी करताना जखमी झाला.

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफ केवळ ऑनस्क्रीनच नव्हे तर सामान्य जीवनातही धोकादायक व कठीण स्टंट करत असतो. टायगरला पाहून त्याचे चाहतेदेखील त्याची कॉपी करण्याचा प्रयत्न करत असतात. अलीकडेच असेच काहीसे चित्र बघायला मिळाले. टायगरचा एक आठ वर्षांचा चाहता त्याच्या स्टंटची कॉपी करताना जखमी झाला. ही माहिती मिळताच टायगरने त्या छोट्या चाहत्याशी संवाद साधला आणि त्याला स्टंटशी संबंधित काही गोष्टी शिकवल्या.

मुंबई मिररच्या वृत्तानुसार, आदित्य जैन हा टायगरचा चाहता दिल्लीत राहतो. काही दिवसांपूर्वी टायगरच्या स्टंटची नक्कल करत असताना त्याच्या हाताला दुखापत झाली. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत टायगरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ कॉलिंगद्वारे टायगरने आदित्यसोबत बातचीत केली.

टायगरने आपल्या चिमुकल्या चाहत्याला सांगितले की, चित्रपटांमध्ये दाखवले जाणारे सर्व स्टंट्स तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सेटवर केले जातात. आणि त्यावेळी बरेच लोक संरक्षणासाठी उपस्थित असतात. टायगरने मुलाला पुन्हा हे करू नको असा सल्लाही दिला. 10 मिनिटांच्या या व्हिडिओ कॉलदरम्यान टायगरने आदित्य आणि त्याच्या कुटुंबियांना मुंबईत येण्याचे आमंत्रण दिले आहे.

लॉकडाऊनपासून टायगर कधी डान्स करतानाची तर कधी वर्कआउट करतानाची छायाचित्रे आणि व्हिडिओ शेअर करतोय. अलीकडे त्याने स्टंट करतानाचाही व्हिडिओ शेअर केला होता. टायगर 'बागी 3'नंतर 'हीरोपंती 2' आणि 'रॅम्बो' मध्ये दिसणार आहे. हे दोन्ही चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित होतील.

बातम्या आणखी आहेत...