आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुड न्यूज:यूट्यूबर अरमान मलिकच्या दुसऱ्या पत्नीने दिला मुलाला जन्म, एकाच वेळी दोन्ही बायका गरोदर राहिल्याने आला चर्चेत

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध यूट्यूबर अरमान मलिकच्या घरी एका चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. अरमान मलिकची दुसरी पत्नी कृतिका मलिक हिने मुलाला जन्म दिला आहे. अरमानने सोशल मीडियावर पत्नीसोबतचे फोटो शेअर करत ही गोड बातमी चाहत्यांना दिली आहे. अरमान मलिकच्या दोन बायका असून दोघीही एकाचवेळी गरोदर राहिल्या हे विशेष. तो आपल्या दोन्ही पत्नींसोबत एकाच घरात राहतो. काही दिवसांपूर्वीच अरमानच्या दोन्ही पत्नी कृतिका आणि पायल यांच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला होता. आता त्याच्या दुसऱ्या पत्नीने मुलाला जन्म दिला आहे.

तीन गर्भपातानंतर आई झाली कृतिका मलिक
अरमान मलिकने 6 एप्रिल 2023 रोजी त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर दोन्ही पत्नी कृतिका आणि पायल मलिक यांच्यासोबतचे मॅटर्निटी फोटोशूट शेअर केले होते. काळ्या रंगाच्या सूटमध्ये अरमान सुंदर दिसला. तर हिरव्या रंगाच्या ऑफ शोल्डर गाऊनमध्ये कृतिकादेखील खूपच सुंदर दिसली. पायलनेदेखील या फोटोशूटसाठी गुलाबी रंगाचा गाऊन परिधान केला होता.

हेच फोटो शेअर करत अरमान मलिकने कॅप्शनमध्ये लिहिले, "अखेर गोलू आई झाली... हा मुलगा आहे की मुलगी? या अंदाज बांधा. तुमच्या आशीर्वादाने दोघेही निरोगी आहेत," असे अरमान म्हणाला. वृत्तानुसार, कृतिकाला एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. ही बातमी समोर येताच चाहत्यांनी अरमान आणि कृतिकावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

तीनदा झाला होता कृतिकाचा गर्भपात
अरमान मलिकची दुसरी पत्नी कृतिका मलिकचे हे पहिले अपत्य आहे. यापूर्वी तिचा तीनदा गर्भपात झाला होता. विशेष म्हणजे अरमानची पहिली पत्नी पायल मलिक देखील लवकरच जुळ्या मुलांना जन्म देणार आहे. आता तिचा आठवा महिना सुरू आहे. अरमानला त्याची पहिली पत्नी पायलपासून एक मुलगा असून त्याचे नाव चिरायू आहे.

दुसरी पत्नी कृतिकासोबत अरमान
दुसरी पत्नी कृतिकासोबत अरमान

2011 मध्ये पहिले लग्न आणि 2018 मध्ये केले दुसरे लग्न
अरमान मलिकने 2011 मध्ये पायल मलिकसोबत पहिले लग्न केले होते. यानंतर 2018 मध्ये अरमानने पायलची मैत्रीण कृतिकासोबत दुसरे लग्न केले. सुरुवातीच्या काळात जरी त्यांच्यात वाद झाला असला तरी आज पायल आणि कृतिका यांच्यात चांगले बाँडिंग आहे.

पहिली पत्नी पायलसोबत अरमान
पहिली पत्नी पायलसोबत अरमान

अरमानचे खरे नाव संदीप, दुसऱ्या लग्नासाठी स्वीकारला इस्लाम धर्म
युट्यूबर अरमान मलिकचे खरे नाव संदीप आहे. तो आधी टिकटॉकर होता. अरमानने इस्लाम धर्म स्वीकारत कृतिकाशी दुसरे लग्न केले आणि स्वतःचे नाव अरमान मलिक ठेवले अशी चर्चा आहे. अरमान मुळचा हैदराबादचा आहे. त्याचे इन्स्टाग्रामवर 17 लाखांहून अधिक तर युट्यूबवर 20 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.