आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोर्नोग्राफी प्रकरण:यूट्युबर पुनीत कौरने लावला आरोप, म्हणाली - 'चित्रपटात काम करण्यासाठी राज कुंद्राने मला पाठवला होता मेसेज, देवा याला आयुष्यभर तुरुंगात सडव'

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुनीत कौरपूर्वी अनेकांनी राज कुंद्रावर गंभीर आरोप लावले आहेत.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी रात्री बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला अटक केली. त्यानंतर मंगळवारी त्याला कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने त्याला आणि त्याचा साथीदार रयान थारप यांना 23 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. दरम्यान राजच्या विरोधात प्रसिद्ध यूट्यूबर पुनीर कौर हिची प्रतिक्रिया समोर आली आहे. यूट्यूबर पुनीत कौर ने सोशल मीडियावर दावा केला आहे की, अश्लील अ‍ॅप 'हॉटशॉट्स' च्या व्हिडिओमध्ये काम करण्यासाठी राज कुंद्राने तिच्याशी संपर्क साधला होता.

पुनीत कौर हिने आपल्या सोशल मीडिया स्टोरीमध्ये काही फोटो शेअर केले आहेत. त्यात तिने लिहिले की, तिचा व्हिडिओ पाहिल्यानंतर राज कुंद्राने सोशल मीडियाच्या माध्यमातून हॉटशॉट्स व्हिडिओमध्ये काम करण्या संबंधीचा मेसेज तिला केला होता.

देवा याला तुरुंगात सडव
पुढे पुनीतने लिहिले की, सुरुवातीला तिला हा एखादा स्पॅम मेसेज असल्यासारखे वाटले होते. तिने लिहिले की, 'हा किती खालच्या पातळीचा माणूस आहे. आम्ही विचार केलेला की मला आलेला मेसेज स्पॅम असेल. देवा याला आयुष्यभर तुरुंगात सडव,' अशी संतप्त प्रतिक्रिया तिने दिली आहे.

सागरिका सुमन हिनेदेखील लावले राज कुंद्रावर आरोप
पुनीत कौरपूर्वी अनेकांनी राज कुंद्रावर गंभीर आरोप लावले आहेत. सागरिका शोना सुमन हिनेदेखील म्हटले की, राज कुंद्राच्या कंपनीद्वारे तिला एक व्हिडिओ कॉल आला होता, ज्यात तिला व्हर्च्युअल ऑडिशन देण्यास सांगण्यात आले होते. तिच्यानुसार, व्हिडिओ कॉलमध्ये उपस्थित व्यक्तीने तिला न्यूड ऑडिशन देण्यास सांगितले होते. मात्र तिने ऑडिशन देण्यास नकार दिला होता.

बातम्या आणखी आहेत...