आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेत्री सोनाक्षी सिन्हा गेल्या काही दिवसांपासून अभिनेता झहीर इक्बालसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. अलीकडेच, 2 जून रोजी सोनाक्षीचा वाढदिवस होता. यानिमित्ताने झहीरने सोनाक्षीसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्याने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पोस्टवर 'आय लव्ह यू' लिहिताना झहीरने सोनाक्षीसोबतचे नाते अधिकृत केले आहे. त्याचबरोबर सोनाक्षीनेही या पोस्टवर प्रतिक्रिया देत नात्याला दुजोरा दिला आहे.
झहीरने पोस्ट शेअर करून नाते अधिकृत केले
व्हिडिओमध्ये सोनाक्षी सिन्हा फ्लाइटमध्ये स्नॅक्स खाताना दिसत आहे. तिच्यावरचे आपले प्रेम व्यक्त करताना झहीरने कॅप्शनमध्ये लिहिले, "वाढदिवसाच्या शुभेच्छा सोन्ज... मला न मारल्याबद्दल धन्यवाद. मी तुझ्यावर प्रेम करतो... येणाऱ्या काळात आपण हसत, खात आणि आनंदाने राहुयात."
या पोस्टवर सोनाक्षीने दिली आहे प्रतिक्रिया
झहीर इक्बालच्या पोस्टनंतर सोनाक्षीने त्यावर कमेंट केली आहे. तिने लिहिले, "धन्यवाद... लव्ह यू... आता मी तुला मारायला येत आहे." झहीरने सोनाक्षीसोबतचे आपले नाते सार्वजनिक केल्यानंतर चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळेजण त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. एका चाहत्याने विचारले, 'लग्न कधी आहे?' त्याचवेळी दुसऱ्याने लिहिले की, 'तुम्ही दोघे एकत्र खूप क्यूट दिसत आहात.' वरुण शर्मा, सिद्धार्थ मल्होत्रा आणि पत्रलेखा या बॉलिवूड सेलिब्रिटींनीही या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दोघेही एका लग्नात एकत्र दिसले होते
दोघेही एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखतात. झहीर आणि सोनाक्षी नुकतेच दिनेश विजनची बहीण पूजा विजनच्या लग्नात दिसले होते. काही काळापूर्वी सोनाक्षीने तिचा ब्युटी ब्रँड लॉन्च केला होता, ज्यासाठी केलेल्या फोटोशूटमध्ये अभिनेत्री हिऱ्याची अंगठी फ्लाँट करताना दिसली होती. तेव्हापासून चाहत्यांनी या दोघांचा साखरपुडा झाल्याचा अंदाज वर्तवला होता.
'डबल एक्सएल'मध्ये सोनाक्षी आणि इक्बाल एकत्र दिसणार आहेत
झहीर हा ज्वेलर्स कुटुंबातील असून तो लहानपणापासून सलमान खानचा चांगला मित्र आहे. झहीरने सलमान खानच्या 'द नोटबुक' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. वर्क फ्रंटबद्दल सांगायचे तर सोनाक्षी आणि झहीर लवकरच आगामी डबल एक्सएल चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. सतराम रमानी दिग्दर्शित या चित्रपटात हुमा कुरैशीही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.