आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेलेब लाइफ:बिग बॉस 12 फेम शिवाशिष मिश्राला डेट करतेय जरीन खान, गोव्यात सुट्टी एन्जॉय करतानाची छायाचित्रे आली समोर

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिवाशिषने अलीकडेच गोवा सुट्टीतील त्यांची छायाचित्रे सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री जरीन खानचे नाव मागील अनेक दिवसांपासून बिग बॉस 12 फेम शिवाशिष मिश्राशी जोडले जात आहे. अलीकडेच शिवाशिषने त्याचा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने जरीन खानने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि दोघांची काही छायाचित्रेदेखील शेअर केली. आता या दोघांची गोव्यात सुट्टी एन्जॉय करतानाची छायाचित्रे समोर आली आहेत, जी त्यांच्या रुमर्ड रिलेशनवर शिक्कामोर्तब करत आहेत.

शिवाशिषने अलीकडेच गोवा सुट्टीतील त्यांची छायाचित्रे सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली आहेत. या फोटोत शिवाशिष आणि जरीन यांच्यातील खास बाँडिंग बघायला मिळत आहे. आपल्या इन्स्टा स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर करत शिवाशिष जरीनला स्वीटी म्हटले आहे. शिवशिषच्या बर्थडे सेलिब्रेशननंतर दोघांनी ही गोवा ट्रीप प्लान केली आहे.

जरीन खानने शेअर केली छायाचित्रे

अलीकडेच शिवाशिषच्या वाढदिवसाच्या खास निमित्ताने जरीनने रोमँटिक पद्धतीने त्याला शुभेच्छा दिल्या. जरीनने शिवाशिषसोबतची छायाचित्रे आणि काहीव व्हिडिओ शेअर करत लिहिले, 'टेडा है पर मेरा है... वाढदिवसाच्या शुभेच्छा शिव. देव तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करो.'

शिवाशिषने देखील जरीनच्या वाढदिवशी एक फोटो कोलाज शेअर केला होता. आणि रोमँटिक अंदाजात तिला शुभेच्छा दिल्या होत्या.

शिवाशिष रिअॅलिटी शो बिग बॉस 12 मध्ये सहभागी झाला होता. सलमान खानने होस्ट केलेल्या या शोमध्ये शिवाशिषला चांगला प्रतिसाद मिळाला, पण तो या शोमध्ये लांबचा पल्ला गाठू शकला नव्हता. तर जरीनच्या वर्कफ्रंट बद्दल सांगायचे तर ती यावर्षी डिस्ने प्लस हॉटस्टारच्या 'हम भी अकेले तुम भी अकेले'मध्ये दिसली आहे.

बातम्या आणखी आहेत...