आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

झरीन खानचे दुःख:अभिनेत्री म्हणाली, 'कतरिना कैफसोबतच्या तुलनेमुळे करिअर उद्धवस्त झाले, 50 किलो वजन कमी करूनही लठ्ठपणामुळे टीकेचा सामना करावा लागला'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एका मुलाखतीत झरीनने तिच्या फ्लॉप चित्रपट कारकिर्दीबद्दल सांगितले.

2010 मध्ये 'वीर' चित्रपटाद्वारे सलमान खानसोबत ड्रीम डेब्यू केल्यानंतरही झरीन खानला बॉलिवूडमध्ये अपेक्षित यश मिळाले नाही. झरीनला कतरिना कैफसोबतच्या मिळत्या जुळत्या लूकमुळे चर्चा मिळाली खरी, मात्र याच मुळे तिचे करिअर उद्धवस्त झाले. एका मुलाखतीत झरीनने तिच्या फ्लॉप चित्रपट कारकिर्दीबद्दल सांगितले.

झरीन म्हणाली, 'सुरुवातीपासूनच लुक अ लाइकसारखी तुलना सुरू झाली. मुलाखतीत घेतलेल्या छायाचित्रांचाही मी कतरिनासारखी दिसत असल्याचे सांगून प्रचार करण्यात आला होता.यामुळे माझी कारकीर्द उद्धवस्त झाली. त्यावेळी सोशल मीडिया आज इतका प्रभावशआली नव्हता. त्यामुळे आम्ही मीडिया हाऊसेस आणि वर्तमानपत्रांवर अवलंबून असायचो. अशा परिस्थितीत मला असे वाटते की लोकांना मला पाहण्याची संधी मिळाली नाही आणि माझ्याविषयी आधीच मत तयार केले गेले. मी त्यांच्यासाठी केवळ गॉसिपचा विषय ठरले.

वाढलेले वजन ठरले अडचणीचे

झरीन पुढे म्हणाली, 'माझ्या वाढलेल्या वजनदेखील मला त्रासदायकच ठरले. 100 किलो वजन झाल्यानंतर मी ते 50 किलो पर्यंत कमी केले, परंतु तरीही लठ्ठपणामुळे माझ्यावर खूप टीका झाली. लोकांनी मला 'फॅटरिना' म्हटले. जेव्हा मी एखाद्या कार्यक्रमाला जायचे तेव्हा माझ्याबद्दल काहीही चांगले लिहिले जात नव्हते, फक्त माझ्या वजनावर चर्चा केली जात होती.'

बॉडी शेमिंग करणा-यांना दिले होते सडेतोड उत्तर
गेल्यावर्षी सोशल मीडियावर झरीनने तिचे एक छायाचित्र शेअर केले होते, ज्यात तिचे स्ट्रेच मार्क्स दिसले होते. हे छायाचित्र बघून लोकांनी तिची खिल्ली उडवली होती. यावर झरीनने टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले होते. तिने लिहिले होते, 'हे त्या लोकांसाठी आहे, ज्यांना माझ्या पोटावर नेमके काय झाले ते जाणून घेण्याची उत्सुकता आहे. 50 किलो वजन कमी करणा-यांच्या पोटावर असेच मार्क्स दिसतात. हे कोणत्याही फोटोशोप किंवा ऑपरेशनमुळे निर्माण झालेले मार्क्स नाहीत. मी सत्यावर विश्वास ठेवणा-यांपैकी आहे. हे झाकण्यापेक्षा मी ते अभिमानाने ते स्वीकारले आहे.' झरीनने 'वीर'शिवाय 'हेट स्टोरी 3' आणि '1921' सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

बातम्या आणखी आहेत...