आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हॅपी बर्थडे झीनत अमान:करिअरच्या सुरुवातीलाच बाॅलिवूड साेडणार हाेत्या झीनत; देव आनंदमुळे झाल्या प्रसिद्ध

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • झीनत अमान यांनी वयाच्या सत्तरीत पदार्पण केले आहे.

1970 ते 80 च्या काळात सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या आणि सिनेमात वेस्टर्न पॅटर्न आणणाऱ्या झीनत अमान यांचा आज वाढदिवस. यानिमित्त त्यांची माहिती जाणून घेऊ...

बॉलिवूडच्या नायिकांची परिभाषा बदलून टाकणारी नायिका म्हणजे झीनत अमान. झीनतने चित्रपटसृष्टीत स्वत:ला वेस्टर्न लूकमध्ये सादर केले. ती जेव्हा बॉलिवूडमध्ये आली तेव्हा बऱ्याच अभिनेत्री भारतीय लूकमध्ये दिसत होत्या. झीनत कॅमेऱ्यासमोर बिनधास्त येत आणि त्यामुळेच त्यांच्या चाहत्यांना त्यांना सेक्स सिम्बॉलचा किताब दिला. झीनतने प्रत्येक मोठ्या निर्माता-दिग्दर्शकसोबत काम केले. त्यांनी देव आनंदपासून ते राज कपूर, फिरोज खान, मनोज कुमार, संजय खान, मनमोहन देसाई, प्रकाश मेहरा, राज खोसला आदींच्या चित्रपटात काम केले.

पत्रकार म्हणून केले काम

झीनत 13 वर्षाेच्या असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यांनी वडिलांचे नाव जोडून झीनत खानवरुन झीनत अमान ठेवले. झीनतने पत्रकार म्हणून फेमिनामध्ये कामही केले. त्यानंतर एका प्रॉडक्टसाठी मॉडलिंगदेखील केली. त्यांनी मिस इंडिया स्पर्धेत भाग घेत दुसरा क्रमांक पटकावला. त्यानंतर 1970 मध्ये मिस आशिया पॅसिफिक बनल्या. 1971 मध्ये ओपी रल्हन यांनी झीनतला 'हलचल’मधून बॉलिवूडमध्ये ब्रेक दिला. 'हलचल’ आणि 'हंगामा’ सारखे चित्रपट फ्लॉफ झाल्यानंतर झीनत नाराज होऊन आपल्या आईकडे जर्मनीला परत जाणार होत्या. मात्र तेव्हाच देव आनंदने त्यांना 'हरे रामा हरे कृष्णा’साठी विचारणा केली. हा झीनतच्या करिअरचा यशस्वी चित्रपट राहिला. त्यानंतर झीनतने मागे वळून पाहिले नाही.

'हरे रामा हरे कृष्णा’ मध्ये झीनतआधी जाहिदा आणि तनुजाला झाली होती विचारणा
'हरे रामा हरे कृष्णा’ साठी देव आनंद यांची पहिली पसंत जाहिदा होत्या, मात्र जाहिदा, देव आनंदच्या बहिणीच्या भूमिकेपेक्षा त्यांच्या प्रेयसीची भूमिका करू इच्छित होत्या. तसे जमले नसल्याने त्यांनी चित्रपट सोडला. त्यानंतर तनुजा या देखील काही कारणास्तव चित्रपट करू शकल्या नाहीत. त्यानंतर देवसाहेबांनी झीनतला साइन केले. त्यानंतर दोघांनी 'हीरा पन्ना’, 'इश्क इश्क इश्क’, 'प्रेम शास्त्र’, 'वारंट’, 'डार्लिंग डार्लिंग’ आणि 'कलाबाज’ सारखे चित्रपट एकत्र केले.

राज कपूरने दिले हाेते बक्षीस म्हणून सोन्याचे नाणे
‘सत्यम शिवम सुंदरम’ साठी झीनतने स्क्रीन टेस्ट दिली होती त्यात पास झाल्यानंतर खुश होऊन राज कपूरने त्यांना सोन्याचे नाणे दिले होते. खरं तर, 'वकील बाबू’च्या शूटिंगदरम्यान राज कपूर 'सत्यम शिवम सुंदरम’च्या स्क्रिप्टवरदेखील काम करत होते. ते नेहमी या चित्रपटातील पात्र रूपाविषयी बोलत असत. राज कपूरने पात्राचे रंगरूप, वेशभूषा समजून सांगितल्यानंतर एक दिवस झीनत रूपा या पात्र सारखे तयार होऊन राज कपूरकडे गेली. झीनतला पाहून राज कपूर चकित झाले. त्यांनी पत्नीला फोन केला आणि बक्षीस देण्यासाठी बोलावले. त्यांची पत्नी सोन्याचे नाणे घेऊन आली. अशा प्रकारे झीनतला पाहून प्रभावित झालेल्या राज कपूर यांनी बक्षीस म्हणून नाणे दिले होते. याचा खुलासा झीनतने एका टीव्हीमध्ये केला होता.

हॉलिवूडला दिला नकार
1976 मध्ये झीनत सुटी घालवण्यासाठी हॉलिवूडला गेल्या होत्या. तेथे त्यांनी एक मोठा अभिनेता आणि दिग्दर्शकाची भेट घेतली होती. त्या मुलाखतीत प्रसिद्ध दिग्दर्शक वॉरेन बीएटने झीनतला हॉलिवूड चित्रपट 'हेवेन कॅन वेट’मध्ये मुख्य भूमिकेची ऑफर दिली होती. मात्र यासाठी झीनतला वर्षभर विदेशात राहावे लागणार होते, त्यामुळे त्यांनी चित्रपटाला नकार दिला.

  • 1970 मध्ये मिस आशिया पॅसिफिक इंटरनेशनलचा किताब जिंकला.
  • 1973 मध्ये 'हरे रामा हरे कृष्णा’साठी उत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार
  • 1979 मध्ये 'सत्यम शिवम सुंदरम’साठी उत्कृष्ट अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्कारात नामांकन
  • 2008 मध्ये झी सिने अवॉर्डतर्फे जीवन गौरव देऊन सत्कार. याच वर्षी ग्रेट वुमन अचीव्हर अवॉर्ड इंडियातर्फे जीवनगौरव देऊन सन्मान
  • 2016 मध्ये फिल्मफेअर अँड स्टाइल अंतर्गत टाइम लेस गँबलर अँड स्टाइल आयकाॅन (फिमेल) पुरस्कार देऊन गौरव.
बातम्या आणखी आहेत...