आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पडद्यामागील:नवाजबाबत ‘गँग्स ऑफ वासेपूर’चा लेखक जीशान कादरीने सांगितले किस्से, म्हणाला - 'नवाजने एकट्यानेच तयार केले होते फैजलचे पात्र'

मुंबई (अंकिता तिवारी)एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सिनेताऱ्यांचे कधीही न ऐकलेले किस्से...

1999 मध्ये ‘सरफरोश’ पासून करिअरची सुरुवात करणाऱ्या नवाजुद्दीन सिद्दिकीला खरी ओळख 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गँग्स आॅफ वासेपूर’चित्रपटाने मिळाली. या चित्रपटासाठी त्याने कशी तयारी केली होते याबाबत चित्रपटाचे लेखक जीशान कादरी सांगत आहेत...

‘नवाज आणि माझी पहिली भेट 2010 मध्ये अनुराग कश्यप यांच्या ऑफिसमध्ये झाली होती. हा ‘गँग्स ऑफ वासेपूर’चा फैजल खान अशी माझी ओळख करून देण्यात आली होती. फैजल खानच्या पात्रात एकरूप होण्यासाठी नवाजकडे सहा-सात महिने होते. त्याच्याशी माझी भेट 2010 च्या सुरुवातीला झाली आणि चित्रपटाचे चित्रीकरण डिसंेबर 2010 ला सुरू होणार होते. हे पात्र हुबेहूब साकारण्यासाठी त्याने भाषेवर खूप लक्ष केंद्रित केले होते. ही भूमिका जिवंत करण्यासाठी तो वेगवेगळ्या पद्धतीने स्वत:वर काम करत होता, मग तो अभिनय असाे वा संवाद असो. आम्हाला तर माहीत पण नसायचे तो स्वत:ला कसा तयार करत आहे. नंतर तो चित्रपटाच्या तयारीसाठी माझ्याकडे यायला लागला त्यावेळी मला समजले की तो कसा काम करतो. त्याचा अभिनय आणि संवादफेक पाहून मी नोट्स बनवून घ्यायचो. नंतर माझा अभिनय पाहून मला सांगायचे की, कोणता संवाद कसा बोलायचा. कुठे थांबायचे आहे आणि कुठे विरामचिन्हे अाहेत. डोळ्यांतून संवाद न बोलता कसे व्यक्त व्हायचे हे देखील मी त्याच्याकडून शिकलो. तो एक चालतीबोलती अभिनयाची शाळा आहे. जर तुम्ही त्याच्यासारख्या अभिनेत्यासोबत काम करत आहात तर तुम्हाला लक्ष देणे गरजेचे आहे. दिग्दर्शकाने अॅक्शन बोलल्यानंतर आणि कट बोलण्यापूर्वी तुम्ही नवाजकडून हजारो गोष्टी शिकू शकता. मला आजही काही अडचण आली तर मी त्याला फोन करून त्याचा सल्ला घेतो.'

मुंबईहून मुजफ्फरनगरला गेलेला नवाज झाला क्वाॅरंटाईन

नवाजुद्दीन याच्या कोराेना व्हायरस तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. नवाज काही दिवसांपूर्वी आपल्या मुजफ्फरनगर येथील बुढाना गावात गेला होता. त्याची आई मेहरुनिसा काही दिवसांपासून आजारी आहेत म्हणून नवाज महाराष्ट्र शासनाची परवानगी घेऊन आपल्या घरी आला आहे. त्याच्या सोबत आई, भाऊ फैजुद्दीन, वहिनी सबादेखील सोबत आले आहेत. ते सर्वजण घरी आल्यावर क्वाॅरंटाईन झाले आहेत. नवाजशी बोलणे झाले तर तो म्हणाला, ‘या महामारीत कोण ईद साजरी करणार? मी आपल्या घरी ईद साजरी करायला आलो नसून आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी आलो आहे. मी फक्त असे आईच्या प्रेमापाेटी केले. नाहीतर जगातील कोणतीच शक्ती मला क्वाॅरंटाईनमधून बाहेर काढूच शकली नसती.’

बातम्या आणखी आहेत...