आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जोहरा सहगल यांची जयंती:रणबीर कपूरच्या 'सांवरिया'मध्ये शेवटच्या वेळी सिल्व्हर स्क्रिनवर झळकल्या होत्या जोहरा सहगल, वयाच्या 102 व्या वर्षी झाले होते निधन

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुमताज-उल्लाख खान होते खरे नाव

भारतीय रंगभूमीच्या ज्येष्ठ अभिनेत्री, कोरिओग्राफर, नृत्यांगणा आणि सिल्व्हर स्क्रिनची आवडती आजी जोहरा सहगल यांची आज 109 वी जयंती आहे. 50 हून अधिक सिनेमे आणि टीव्ही मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मन मोहून घेणा-या जोहरा सहगल यांचा जन्म 27 एप्रिल 1912 रोजी यूपीतील सहारनपूर येथील एका पठाण कुटुंबात झाला होता. त्या मुमताजुल्ला खान आणि नातीक बेगम यांच्या सात अपत्यांपैकी तिसरे अपत्य होते. जोहरा यांचे बालपण उत्तराखंडच्या चकराता येथे गेले. जोहरा यांनी पृथ्वीराज कपूर यांच्या पृथ्वी थिएटरमध्ये 14 वर्षे नाटकांत काम केले आणि त्यानंतर त्या चित्रपटांकडे वळल्या.

मुमताज-उल्लाख खान होते खरे नाव
जोहरा सहगल यांचे खरे नाव बेगम मुमताज-उल्लाख खान होते. मात्र डान्सर आणि परफॉर्मर कामेश्वरनाथ सहगलसोबत लग्न झाल्यानंतर त्यांचे नाव जोहरा सहगल झाले. 14 ऑगस्ट 1942 रोजी कामेश्वरनाथ यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्या होत्या.

अल्मोडा येथे उद्य शंकर शाळेत त्यांची कामेश्वरनाथ यांच्यासोबत पहिली भेट झाली होती. लग्नानंतर त्यांनी मुलगी किरण आणि मुलगा पवन यांना जन्म दिला. दुर्दैवाने ऐन तारुण्यातच त्यांच्या पतीचे निधन झाले. पतीच्या निधनानंतर जोहरा यांनी समर्थपणे आपल्या मुलांचे पालनपोषण केले.

'सांवरिया' होता शेवटचा चित्रपट
जोहरा सहगल यांनी आपला पहिला पब्लिक परफॉर्मन्स 1935 मध्ये उदय शंकर यांच्यासोबत दिला होता. तर त्यांना सिनेसृष्टीतील पहिली संधी के.ए.अब्बास यांनी 1946 मध्ये दिली होती. सिनेमाचे नाव होते 'धरती के लाल'. त्यांनी आपल्या सिनेसृष्टीतील करिअरमध्ये नीचा नगर, अफसर, दिल से, कल हो न हो, वीर-जारा आणि चीनी या सिनेमांमध्ये काम केले होते. वयाच्या पंचाहत्तरीनंतर त्यांनी ‘दिल से’, 'हम दिल दे चुके सनम', 'चीनी कम', 'कभी खुशी कभी गम', ‘वीर-जारा’ आणि 'सांवरिया' या चित्रपटांमध्ये काम केले होते. 2007 मध्ये आलेला 'सांवरिया' हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता.

प्रत्येक पिढीतील कलाकारांसोबत केले काम
उल्लेखनीय बाब म्हणजे जोहरा सहगल यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये प्रत्येक पिढीतील कलाकारांसोबत काम केले आहे. यामध्ये पृथ्वीराज कपूर यांच्यापासून ते त्यांचे पणतू रणबीर कपूरच्या नावाचा समावेश आहे. थिएटरवर प्रेम असलेल्या जोहर यांनी पृथ्वीराज कपूर थिएटरमध्ये जवळपास 14 वर्षे काम केले. 'तंदूरी नाइट्स'ला त्यांची सर्वात उत्कृष्ट मालिका मानले जाते.

मुलीने लिहिली होती "Zohra Sehgal: Fatty" ही बायोग्राफी
2012 मध्ये त्यांची बायोग्राफी "Zohra Sehgal: Fatty" वाचकांच्या भेटीला आली. ही बायोग्राफी त्यांची लेक किरण सहगल यांनी लिहिली होती. त्यांना 1998मध्ये पद्मश्री आणि 2010 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 10 जुलै 2014 रोजी वयाच्या 102 व्या वर्षी जोहरा सहगल यांनी या जगाचा निरोप घेतला.

बातम्या आणखी आहेत...