आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानची मुलगी सुहानाला सिनेसृष्टीत करिअर करायचे असल्याचे त्याने अनेकदा सांगितले आहे. आता लवकरच सुहाना बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार असल्याची चर्चा आहे. चित्रपट निर्माती-दिग्दर्शिका झोया अख्तर 21 वर्षीय सुहानाला शो-बिझमध्ये लाँच करण्याचे प्लानिंग करत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, सध्या झोया आंतरराष्ट्रीय कॉमिक बुक आर्चीच्या भारतीय रुपांतरणावर काम करत आहे. ती ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्ससाठी हा प्रोजेक्ट बनवणार आहे. ही एक किशोरवयीन कथा असेल ज्यासाठी झोया अनेक तरुण कलाकारांच्या शोधात आहे जे चित्रपटात मित्रांची भूमिका साकारतील. चित्रपटाचे कास्टिंग अद्याप सुरू आहे, पण मुख्य भूमिकेसाठी शाहरुखची मुलगी सुहाना भूमिकेत फिट बसत असल्याचे झोयाचे मत आहे. जर सुहाना आणि शाहरुखला स्क्रिप्ट आवडली तर गोष्टी पुढे सरकतील. आणि हा चित्रपट सुहानाचा पदार्पणातील चित्रपट ठरु शकेल.
शॉर्ट फिल्ममध्ये दिसली होती सुहाना
सुहानाने नोव्हेंबर 2018 मध्ये 'द ग्रे पार्ट ऑफ ब्लू' मध्ये काम केले होते. इंग्रजीत असलेल्या या 10 मिनिटांच्या लघुपटातील सुहानाच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले आणि तिच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल उत्सुकता वाढली होती.
शाहरुखने यापूर्वी अनेकदा सांगितले की, सुहाना चित्रपटात येण्यापूर्वी तिचे शिक्षण पूर्ण करेल. रिपोर्ट्सनुसार, सुहाना सध्या लंडनमध्ये फिल्म मेकिंगचा कोर्स करत आहे. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ती अभिनयात करिअर करेल. तिने शाहरुख खानच्या 'झिरो' चित्रपटात असिस्ट केले होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.