आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
शुभमंगल ऑनलाईन मालिकेमध्ये बर्याच घटना घडत आहेत. मालिका आता रंजक वळणावर येऊन पोहचली आहे. ऐश्वर्याच्या जाळ्यामध्ये शंतनू पूर्णत: अडकला आहे. ऐश्वर्याने केलेल्या पोलिस तक्रारीमुळे शंतनूला अटक झाली आहे, त्याला बेल न मिळाल्याने 14 दिवस आता शंतनू तुरुंगात रहाणार आहे. या सगळ्यामुळे कुठेतरी शर्वरीला वाटू लागले आहे की, ती शंतनूला पोलिसांच्या कस्टडी मधून सोडवू शकली नाही. पण यामध्ये मात्र अनुपमा तिला धीर देते आणि कठीण परिस्थितिमध्ये शंतनूच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहाणे महत्वाचे आहे असे शर्वरीसोबत घरातील इतरांना देखील पटवून देते.
एकीकडे शर्वरीला शंतनूला भेटता येत नाहीये, त्यामधून ऐश्वर्याच्या वेगवेगळ्या खेळी सुरू आहेत. पण या सगळ्यामध्ये अनुपमा मात्र तिला खडासवते आणि दुसरीकडे शर्वरी खूप मोठं पाऊल उचलणार आहे.
शंतनूच्या वकिलाला ऐश्वर्याच्या वकिलासोबत बघितल्यावर कुठेतरी शर्वरीला शंका येऊ लागते. आपला माणूस कितीही मोठ्या संकटात का असेना त्याला बाहेर काढण्यासाठी कुठला ना कुठला मार्ग शोधून काढतोच. आणि आता मालिकेमध्ये शंतनूला शर्वरीची खंबीर साथ मिळणार आहे. शंतनूची केस शर्वरी लढण्याचा निर्णय घेणार आहे. यानंतर काय घडेल हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. शर्वरी शंतनूला कशी या सगळ्यामधून सोडवेल ? यामध्ये ऐश्वर्या कुठली नवी खेळी खेळेल ? आणि त्यावर तिला शर्वरी कशी मात देईल ? मालिकेमध्ये पुढे काय होणार हे बघणं रंजक असणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.