आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरी नटली...:संजनाचा लग्नातील लूक व्हायरल, पण खरंच अनिरुद्ध-संजनाचे लग्न होणार का!

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गुलाबी रंगाच्या साडीत संजनाचं सौंदर्य आणखीनच खुलून आलं आहे.

स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते' ही मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. अनिरुद्ध आणि अरुंधतीचा घटस्फोट झाल्यानंतर संजनाला वेध लागले ते लग्नाचे. गेली कित्येक वर्ष ती ज्या दिवसाची वाट पहात होती तो दिवस आता जवळ आलाय. 30 ऑगस्ट ही या दोघांच्या लग्नाची तारीख पक्की झाली आहे.

अनिरुद्धसोबत लगीनगाठ बांधून देशमुखांच्या घरात गृहप्रवेश करण्याचं तिचं स्वप्न पूर्ण होणार का याची उत्सुकता आता वाढली आहे. लग्नामध्ये संजना नटण्याची सर्व हौस भागवून घेणार आहे. गुलाबी रंगाच्या साडीतला तिचा ब्रायडल लूक सध्या व्हायरल होतोय.

'आई कुठे काय करते' मालिकेतल्या संजनाच्या लूकची नेहमीच चर्चा राहिली आहे. संजनाचं स्टाइल स्टेटमेंेट तिच्या चाहत्या फॉलो करताना दिसतात. संजनाची भूमिका साकारणाऱ्या रुपाली भोसलेला देखील फॅशनचे नवनवे ट्रेंड ट्राय करायला खूप आवडतं. त्यामुळे अनिरुद्धसोबतच्या लग्नासाठी तिने खास तयारी केलीय.

गुलाबी रंगाच्या साडीत तिचं सौंदर्य आणखीनच खुलून आलं आहे. अनिरुद्धच्या नावाची मेहेंदीही तिच्या हातावर सजली आहे. आता या दोघांचं लग्न पार पडणार की इथेही नवा ट्विस्ट येणार हे मालिकेच्या पुढील भागांमधून कळेल.

बातम्या आणखी आहेत...