आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीव्ही अपडेट:विराट शक्तीला भेदून आर्या काळुबाईचं देऊळ उघडणार का?, 'आई माझी काळुबाई' मालिकेला नवं वळण

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'आई माझी काळुबाई' या मालिकेचा महाएपिसोड 7 फेब्रुवारी रोजी संध्या सात वाजता प्रेक्षकांना बघता येणार आहे.

छोट्या पडद्यावरील 'आई माझी काळुबाई' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. ‘आई काळुबाई’ हे सातारा जिल्ह्यातल्या वाई तालुक्यातलं लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं देवस्थान आहे. मालिकेतली गोष्ट ही आर्याच्या भक्तीची आणि काळुबाईच्या शक्तीची गोष्ट आहे. या मालिकेतल्या आर्याची काळुबाईवर असलेली भक्ती तिला सर्व संकटांतून मार्ग काढण्यासाठी मदत करते.

येत्या 7 तारखेला आई माझी काळुबाईचा महाएपिसोड आहे. पाटलांच्या घरात कोणीतरी सुरुंग स्फोट घडवण्याचं कारस्थान करतं, पण आर्या मात्र ते कारस्थान हाणून पाडते आणि आर्या काहीतरी करणार असल्याचा अंदाज विराटला येतो. तो आणि पाटील कुटुंब तिच्यावर नजर ठेवू लागतं आणि आर्या घराबाहेर कशी पडणार हा प्रश्न निर्माण होतो. आर्या आता विराट शक्तीला भेदून गावातलं काळुबाईचं देऊळ उघडणार का, हे पाहणं खूप उत्कंठावर्धक असेल.

बातम्या आणखी आहेत...