आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षया-हार्दिक पाठोपाठ 'हा' अभिनेता अडकला लग्नबेडीत:दापोलीच्या समुद्रकिनारी झाला लग्नसोहळा, बघा PHOTOS

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर नुकतेच लग्नाच्या गाठीत अडकले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू होती. पुण्यात शाही पद्धतीने दोघे साता जन्माच्या गाठीत अडकले. हार्दिक आणि अक्षया पाठोपाठ मराठी इंडस्ट्रीतील आणखी एक अभिनेता विवाहबद्ध झाला आहे. त्याच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

अभिनेता आशय कुलकर्णी आणि सानिया गोडबोलेसोबत विवाहबद्ध झाल आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. दापोलीच्या समुद्रकिनारी त्यांचा लग्नसोहळा संपन्न झाला. आशय आणि सानियाच्या लग्नाला अभिनेता विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांनी हजेरी लावली. विराजस कुलकर्णीने लग्नातील खास फोटो शेअर करत ‘द कुलकर्णीज’ असे कॅप्शनही दिले आहे. आशय आणि सानिया यांच्या लग्नाच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा आहे.

'पाहिले न मी तुला' या मालिकेतून आशय प्रसिद्धीझोतात आला आहे. या मालिकेत त्याने मुख्य भूमिका साकारली होती. तो मालिकेत तन्वी मुंडले आणि शशांक केतकरसोबत दिसला होता. त्यानंतर तो 'माझा होशील ना' मालिकेतही झळकला होता. आशय लवकरच 'व्हिक्टोरिया' या भयपटात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसोबत दिसणार आहे. सध्या या चित्रपटाचं सोशल मीडियावर जोरदार प्रमोशन सुरू आहे. चित्रपटात आशय मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट 16 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. तर आशयची पत्नी सानिया ही नृत्यांगणा आहे.

बातम्या आणखी आहेत...