आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पहिलाच प्रयाेग:16 कलाकारांनी घरात स्वत:च केले फोनवर मालिकेचे चित्रीकरण, अभिनयासह इतर कामांचीही जबाबदारी

नाशिकएका वर्षापूर्वीलेखक: प्रवीण पवार
  • कॉपी लिंक
  • लाॅकडाऊनच्या काळात घरातच चित्रित-दिग्दर्शित झाली ‘आठशे खिडक्या नऊशे दारं’ मराठी मालिका

पीयूष नाशिककर 

काेराेनाच्या संकटामुळे टीव्ही मालिका विश्व ठप्प झाले आहे. यावर मराठी कलाकार-निर्मात्यांनी अफलातून पर्याय शोधला. ‘आठशे खिडक्या नऊशे दारं’ या मालिकेतील कलाकारांनी आपल्या पात्राचे चित्रीकरण स्वत:च आपल्याच घरी केले. दिग्दर्शकाने फोनवरून सूचना दिल्या. यातून साकारलेल्या मालिकेचे सोमवारपासून प्रक्षेपण होणार आहे. काेराेनामुळे अजून किती दिवस काम बंद ठेवणार या विचाराने लेखक, दिग्दर्शक श्रीरंग गाेडबाेले, स्वप्नील मूरकर, मारुती देसाई व इतर कलाकारांनी हा पर्याय शोधला. या मालिकेत काम करणाऱ्या १६ कलाकारांनी अभिनयासह स्वत:च चित्रीकरण, तर दिग्दर्शकाने घरूनच दिग्दर्शन केले. 

फोनवरून सर्वांशी समन्वय ठेवत मालिका तयार झाली. मराठी मालिका विश्वातील हा पहिलाच प्रयाेग आहे. लीना भागवत, विशाखा सुभेदार, नम्रता आवटे, मंगेश कदम, आनंद इंगळे, समीर चाैगुले, सुव्रत जाेशी, सखी गाेखले यांच्यासह १६ कलाकार या मालिकेमध्ये झळकणार आहेत. 

कसही करून उत्तर शाेधायचं हाेतं...

लाॅकडाऊनमुळे रिपीट एपिसाेड सुरू आहेत. मग कल्पना सुचली की, घरूनच मालिका करावी, कथानकच तसं लिहावं. कलाकारांनाच सर्व कामे करावी लागली. भजी तळण्याचा सीन असेल तर त्यांनीच भजी तळली. हे करताना काेणी मध्ये येणार नाही, आवाज येणार नाही हेही बघायंच होतं. सगळ्यांचे फाेन सारखे नाहीत. मग एडिटिंग ते फूटेज एका पातळीवर आणणं, असं आव्हान सर्वांनी पेललं. - श्रीरंग गाेडबाेले, लेखक, दिग्दर्शक

बेडरूमची ग्रीनरूम, हाॅलचा स्टुडिओ

श्रीरंगने ही कल्पना एेकवली तेव्हाच माझी एक्साइटमेंट वाढली. टेक्निकली हे अवघड आहे, पण मजाही येतेय. तालीम करणे, ती व्हाॅट‌्सअॅपवर दिग्दर्शकाला पाठवणे, मग आेके आलं तर ठिक नाहीतर काही छाेटे बदल करून पुन्हा ड्राॅपबाॅक्समध्ये टाकायचं. मालिकेसाठी आम्ही बेडरूमला मेकअप रूम केलंय, कपडे, इतर सामान तिकडे ठेवलंय, तर गॅलरी, हाॅल, काॅरिडाॅर हा आमचा स्टुडिआे आहे. - मंगेश कदम, दिग्दर्शक, अभिनेते

स्पाॅटबाॅय ते प्रत्येकाचं महत्त्व समजलं

मी मालिकेत अभिनयासोबतच स्पाॅटबाॅय, लाइटमन, कपडेपट करणे आदी कामेही करतेय. त्यामुळे या पडद्यामागील कलाकारांचे महत्त्व अधिक जाणवतंय. आम्ही घरातच नाटकाच्या तालमीसारखी तालीम करताे. मंगेश कदम दिग्दर्शकही असल्याने ते डाेकं लावतात. मग एखाद्या सीनसाठी दाेरीची गरज भासते, घरात शोधाशोध होते... असं डाेकं लढवत ताे सीन हाेताे. - लीना भागवत, अभिनेत्री

बातम्या आणखी आहेत...