आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराझी मराठीवरील 'तू तेव्हा तशी' या आगामी मालिकेची प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरु आहे. या मालिकेची पहिली झलक पाहिल्यापासूनच प्रेक्षकांची मालिकेबद्दलची उत्सुकता वाढली आहे. ही मालिका 20 मार्च पासून रात्री 8 वाजता प्रसारित होणार असून स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर ही जोडी पहिल्यांदाच या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
या मालिकेत प्रेक्षकांचा अजून एक आवडता चेहरा एका महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री अभिज्ञा भावे ही टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक वेगवेगळ्या भूमिकांमधून अभिज्ञाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. 'तू तेव्हा तशी' या मालिकेतून देखील अभिज्ञा छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
'तू तेव्हा तशी' या मालिकेचा प्रोमो आपल्या सोशल मीडियावर शेअर करत अभिज्ञा म्हणाली, "सो ऑफिशिअली मी तुम्हाला पुन्हा भेटायला येते आहे एका अशा भूमिकेत जी मला याआधी करायला मिळाली नाही.. मी आशा करते की प्रेक्षकांकडून मला भरभरून प्रेम आणि पाठिंबा मिळेल, कारण माझी मेहनत 100 पटीने जास्त असणार आहे."
अभिज्ञा कुठली व्यक्तिरेखा निभावणार ही माहिती अजून तरी गुलदस्त्यातच आहे, पण तिची भूमिका प्रेक्षकांची मनं नक्कीच जिंकेल यात शंकाच नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.