आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी वेब सीरिज:अभिजीत, शशांक, मृण्मयी लवकरच एकत्र, म्हणतात - 'सोपं नसतं काही'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विप्लवा एंटरटेनमेंटस् एलएलपी निर्मित 'सोपं नसतं काही'

पाच वर्षात पाच प्रोजेक्टस्, 21 नॅामीनेशनस्, 11ॲवॅार्डस् अशी घवघवीत कामगिरी करणाऱ्या विप्लवा एंटरटेन्मेंटस् एलएलपी ही निर्मिती संस्था आता एक नवी कोरी वेब सीरिज प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर लवकरच घेऊन येणार आहे.

डावीकडून संतोष गुजराथी, शशांक केतकर, अक्षय बर्दापूरकर, मृण्मयी देशपांडे, अभिजीत खांडकेकर, मयुरेश जोशी, आशुतोष हिंगे
डावीकडून संतोष गुजराथी, शशांक केतकर, अक्षय बर्दापूरकर, मृण्मयी देशपांडे, अभिजीत खांडकेकर, मयुरेश जोशी, आशुतोष हिंगे

'सोपं नसतं काही' असे या वेब सीरिजचे नाव असून विप्लवा एंटरटेन्मेंटस् एलएलपीचे संतोष रत्नाकर गुजराथी हे या वेब सीरिजचे निर्माते आहेत.वेब सीरिजचे लेखन, दिग्दर्श, संगीतकार अशी तिहेरी भूमिका मयुरेश जोशी सांभाळणार आहेत. अभिनेता अभिजीत खांडकेकर, शशांक केतकर आणि अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांच्या महत्वपूर्ण भूमिका असून अभिनेते आनंद इंगळे पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेतून आपल्या भेटीस येणार आहेत.

विप्लवा एंटरटेन्मेंटस एलएलपीने याआधी रंगभूमीवर ॲब्सोल्युट, घरात मॅरिड बाहेर बॅचलर, नॅाक नॅाक सेलिब्रिटी अशी वैविध्यपूर्ण नाटकं तर छोट्या पडद्यावर रुद्रम, कट्टीबट्टी अशा मालिकांची निर्मिती केली आहे. 'किस्से बहाद्दर' या वेब सीरिजची निर्मिती देखील त्यांनी केली होती. आगामी 'सोपं नसतं काही' या वेब सीरिज मधून नक्की काय 'सोपं नसतं काही' हे जाणून घेण्यासाठी अजून थोडी वाट पहावी लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...